पिपरिया क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्याचा भाजप प्रवेश

????भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात वाढली गर्दी
????माजी आमदार संजय पुराम यांच्या नेतृत्वावर विश्वास
????पिपरिया क्षेत्रात वर्तमान आमदारांला झटका, कॉंग्रेसला मोठे खिंडार…
साखरीटोला-: (रमेश चुटे) सालेकसा तालुक्यातील पिपरिया ग्रामपंचायतचें उपसरपंच व वर्तमान आमदार सहसराम कोरोटे यांचे खंदे समर्थक असलेले कॉंग्रेस नेते व पत्रकार गुणाराम मेहर यांनी काही दिवसापूर्वीच कांग्रेसला रामराम ठोकून अनेक कार्यकर्त्यांसह भाजप मधे प्रवेश केला होता. 20 जानेवारी रोजी सालेकसा तालुक्यातील पिपरिया नावागड येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित होते. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व क्षेत्राचें माजी आमदार संजय पुराम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शैकडो कार्यकर्त्यांनीं भाजप मधे प्रवेश घेतला. आदिवासी बहुल पिपरिया क्षेत्रातील बदलत असलेल्या राजकीय चित्रामुळे कांग्रेसचें विद्यमान आमदार कोरोटे यांना मोठा झटका बसणार आहे. भाजप मधे सहर्ष प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांना पुराम यांनी पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन भारतीय जनता पक्षात स्वागत केले. आदिवासी क्षेत्रातील कांग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भाजप प्रेमामुळे कॉंग्रेसला मोठे खिंडार पडणार असून याचा परिणाम आगामी निवडणुकीत बघायला मिळेल अश्या चर्चाना ऊत आले आहे. भाजप प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारले असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्य व गरीब जनतेसाठी सुरु केलेल्या योजनांशी प्रभावित होऊन भाजप मधे प्रवेश करित असल्याचे मान्य केले. प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना मदत, गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत गरीब, दुर्बल व मध्यमवर्गीय लोकांना मोफत रेशन, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत एलपीजी गॅस कनेक्शन, आयुष्मान भारत योजना अंतर्गत 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा, हर घर जल योजना अंतर्गत पाइपलाइनद्वारे शुद्ध पाणी पुरवठा, कोरोना महामारी दरम्यान मोफत कोरोना लसीकरण, अश्या विविध योजना गरीब व सर्व सामान्यासाठी गरजेच्या असल्याचे सांगत माजी आमदार संजय पुराम यांची कार्यशैली व विकासाप्रति आत्मीयता बघुन जनसेवेसाठी भाजप मध्ये प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केले. येत्या निवडणुकीत आमगाव/देवरी विधानसभा क्षेत्रात निश्चितच भाजपची शक्ती वाढणार आहे. यामुळे माजी आमदार संजय पुराम यांच्या कुशल नेतृत्वाची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी भाजपचें तालुका अध्यक्ष गुमानसिंग उपराडे, महामंत्री मनोज बोपचे वीरेंद्र उईके, रामदास हत्तीमारे, रामलाल डिब्बे, गुणाराम मेहर, भाजप आदिवासी आघाडीचें तालुका अध्यक्ष सरोज परतेती, आमगाव प.स.चें उपसभापती छोटूभाऊ चौधरी, परसराम फुंडे, बद्रीप्रसाद दसरिया, टिकेश बोपचे,आर. डी. रहांगडाले, सुनील अग्रवाल, बाबा लिल्हारे, धिरेंद्र अग्रवाल, सेवकदास दशरीया, साहेबदास लिल्हारे, दानेश्वर नवगोडे, कवलंचंद दसरीया, महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ. मधू अग्रवाल व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गुणाराम मेहर यांनी केले तर आभार रामलाल डिब्बे यांनी मानले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: पिपरिया क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्याचा भाजप प्रवेश, ID: 29442

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर