????भाजप आदिवासी आघाडीचें तालुका अध्यक्ष सरोज परतेती, व भाजप कार्यकर्ता गुणाराम मेहर, यांच्या नेतृत्वात पुन्हा कांग्रेसच्या सहा कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश!
देवरी (प्रति)-: सालेकसा तालुक्यातील पिपरिया ग्रामपंचायतचें उपसरपंच कॉंग्रेस नेते व पत्रकार गुणाराम मेहर यांनी कांग्रेसला रामराम ठोकून भाजप मधे प्रवेश घेतल्यानंतर 20 जानेवारी रोजी शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला होता. तर तीन दिवसानंतरच म्हणजे 23 जानेवारी रोजी भाजप आदिवासी आघाडीचें तालुका अध्यक्ष सरोज परतेती आणि भाजप कार्यकर्ते गुणाराम मेहर यांच्या नेतृत्वात माजी सरपंच व कांग्रेसचें प्रभावी वरिष्ठ कार्यकर्ते शामलाल लिल्हारे, श्रीचंद राऊत, धनराज राऊत, प्रकाश राऊत, अमरचंद राऊत, गणेश नेवारे, यांनी कांग्रेसला दणका देत भाजप मधे प्रवेश करून कांग्रेस पक्षाला जबर झटका दिला आहे. माजी आमदार संजय पुराम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुराम यांचे निवास स्थळ पुराडा येथे जाऊन भाजप मधे प्रवेश घेतला आहे. दरम्यान संजय पुराम यांनी पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले. पिपरियाचें उपसरपंच गुणाराम मेहर हे लोंकाच्या सुखा-दुःखात सहभागी होणारे जमिनीस्तरचें कार्यकर्ता आहेत. त्याच्या भाजप प्रवेशामुळे कॉंग्रेसला मोठे खिंडार पडणार हे निश्चित समजले जात होते. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर शैकडो कार्यकर्त्यांनी कांग्रेसला रामराम ठोकून भाजप मधे प्रवेश घेतला आहे. भाजप मधे प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की कांग्रेस पक्षात खऱ्या कार्यकर्त्यांचा मानसन्मान नाही, स्वतःचें मानसन्मान व क्षेत्राच्या विकासासाठी माजी आमदार पुराम यांची कार्यशैली व विकासाप्रति आत्मीयता बघून भाजप मध्ये प्रवेश घेतला असल्याचे स्पष्ट केले. सालेकसा तालुक्यातील आदिवासी बहुल पिपरिया क्षेत्रातील नागरिकांचा विश्वास वाढत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत आमगाव/देवरी विधानसभा क्षेत्रात भाजप जबरदस्त मुसंडी मारणार अशी सर्वत्र चर्चा आहे. यावेळी भाजप आदिवासी आघाडीचें तालुका अध्यक्ष सरोज परतेती, व भाजप कार्यकर्ता गुणाराम मेहर उपस्थित होते.
