भाजप,राष्ट्रवादी,,शिवसेना सरकारच्या नेत्यांकडे गेलो.तर महाराष्ट्र राज्याचे (उपमुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस)च करु शकतात हेच सांगितले नागपुरः- ( दि. २४/०१/२०२४ बुधवार) ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे आंदोलन 13/12/2023 पासुन सुरु असुन त्यांना भरपुर नेत्यांनी आश्वासने दिले.त्यांच्या आश्वसनावर संगणक परिचालक संघटनेने विश्वास ठेवुन आमच्या मागण्या पुर्ण होतील म्हणुन मागील 12 वर्षापासुन सतत संर्घष चालु आहे.पण त्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी सरकार कोणतेही पाऊल उचलत नाही. त्यासाठी घरी मरण्यापेक्षा नागपुर येथील संविधान चौकात संगणक परिचालकांसाठी मरु अशी भुमिका घेतली आहे. नागपुर येथिल हिवाळी अधिवेशनात ८ दिवस रात्र-दिवस तेथेच होतो.शासनानी दिशा भुल करुन आमचा मोर्चा मोडकळीस लावला व अधिवेशन संपल्यामुळे आम्हाला पण मोर्चा स्थगित करावा लागला पण कामबंद आंदोलन सुरु आहे.आम्ही आमच्या खात्याचे ( ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन ) यांनी शुध्दा देवेंद्र फडणवीस साहेबासोबंत बोलुन तुमचा प्रश्न सोडवतो म्हणुन सांगितले नंतर भाजप,राष्ट्रवादी,,शिवसेना सरकारच्या नेत्यांकडे गेलो.आमची छोटसी मागणी मान्य करा म्हणुन विनंती केली तर सर्वच नेत्यांनी आम्हाला फक्त तुमची मागणी पुर्ण करु शकतात तर महाराष्ट्र राज्याचे (उपमुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस)म्हणुन आम्ही नागपुर येथे आमरण उपोषण करण्याचे ठरविले आहे. आम्हाला न्याय मिळाला तर बंर नाही तर महाराष्ट्र राज्याचे (उपमुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस) यांच्या नगरितच आपले जिवन आमरण उपोषण करुन संपवुन टाकु असे महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव जितेंद्र साखरे यांनी सांगितले.