????भाजप महिला आघाडी व संजीवनी ग्रामसंस्थाच्या वतीने कारूटोला/साखरीटोला येथे नारीशक्ती सन्मान मेळावा थाटात
साखरीटोला-: देशातील महिलांना सशक्त व स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा खरं काम देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांनी केले. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आमगाव/देवरी मतदार संघ, व संजीवनी ग्रामसंस्थाच्या वतीने कारूटोला/साखरीटोला येथे 10 फेब्रुवारी रोजी भव्य शक्ती सन्मान मेळाव्याचें आयोजन करण्यात होते. कारूटोला ग्रामपंचायतच्या मैदानावर नारीशक्ती सन्मान सोहळा व शक्तिवंदन, महिला बचत गट तसेच महिला एनजीओ कार्यशाळा हा भव्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचें उदघाटन खासदार यांच्या हस्ते पार पडला यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, भाजपचें जिल्हाध्यक्ष ऍड. येशूलाल उपराडे, माजी आमदार संजय पुराम, कृउबास आमगांवचें सभापती केशव मानकर, गोंदिया जि.प.चें माजी अध्यक्ष विजय शिवणकर, शिक्षणमहर्षी झामसिंगजी येरणे, कृउबास देवरीचे सभापती प्रमोद संगीडवार, कारुटोलाचें सरपंच ऊमराव बोहरे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, गोंदिया जि. प.च्या महिला बालकल्याण सभापती सविता पुराम, सालेकसाचें तालुकाध्यक्ष गुमानसिंग उपराडे, देवरीचे तालुकाध्यक्ष प्रविण दहिकर, आमगांवचें तालुकाध्यक्ष राजेंद्र पटले, परसराम फुंडे, राजेंद्र गौतम, अनिल बिसेन, नितेश वालोदे, सुनील अग्रवाल, रमेश चुटे, हितेश डोंगरे, देवराम चुटे, पुर्थ्वीराज शिवणकर, कैलास बहेकार, भीमराज बोहरे, प्रज्ञाताई संगिडवार, देवकि मरई, अर्चना मडावी, प्रतिभा परिहार, सुषमा भुजाडे, मधूताई अग्रवाल, रोशनी गायकवाड, स्नेहा मानकर, कल्पना वालोदे, अंजूताई बिसेन, सुनंदा उके, गीता गोंडाने, गिता शेंडे, तिलकचंद मडावी, वैशाली पंधरे, योगिता फुंडे, शालिक गुरुनुले, ममता अंबादे, कौशल्या कुंभरे, सरिता हरिणखेडे, शामकला गावळ, नुतन सयाम, तनुजा भेलावे तसेच मोठ्या संख्येने आमगाव विधानसभा क्षेत्रातील महिला भगिनीं व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमगाव/देवरी मतदार संघातील उपस्थित महिला बचत गट व महिला एनजीओ यांच्याशी चित्राताई वाघ यांनी मुक्तपणे संवाद साधला. बोलताना त्या पुढे म्हणाले की बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करत त्यांचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास देण्याचा काम देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे व करत आहेत. याचाच पुढचा टप्पा म्हणून आज देशातील एक कोटी बचत गटांसह अकरा कोटी महिलांना अधिक कार्यशील बनविण्याच्या दृष्टीने या शक्तिवंदन कार्यक्रमाने वेग धरला आहे. देशातील सुमारे चार कोटी महिलांना त्यांचे नावावर पक्के घर दिले आहे. महिलांना 50 टक्के आरक्षण आणि अल्पवयीन असो वा इतर महिलांना कोणी अत्याचार केला तर त्यांच्यासाठी कायदा करत आरोपीला थेट फाशीची शिक्षा. आता वय वर्ष 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जाणार आहे. विशेष अशा लसमुळे त्या मुलींना भविष्यात गर्भाशयाचा कॅन्सर होणार नाही अशी विशेष काळजी मोदीजींनी घेतली आहे. असे प्रतिपादन मोठया संख्येने उपस्थित महिलाशी बोलताना सौ. चित्राताई वाघ यांनी केले. यावेळी आदर्श संसदचा पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार अशोक नेते यांचे महिला पदाधिकाऱ्यांचें वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले.
देशाची प्रगती करणाऱ्या तुमच्या सन्मानासाठी हा कार्यक्रम- खा. नेते
महिलांच्या जीवनामध्ये खूप संघर्ष आहे हे पाहून देशाचे यशस्वी पंतप्रधान यांनी पंतप्रधानाची सूत्रे हातात घेताच महिलांना सक्षम करायच्या दृष्टीने कामे करण्यास सुरुवात केली. नवनवीन योजना त्यांनी घोषित केल्या व आणखीही महिलांसाठी खूप काही योजना राबविण्याचे आहे. देशाच्या प्रगती त महिलांचाही मोठा वाटा आहे या दृष्टिकोनातून त्यांच्या रक्षणासाठी अनेक निर्णय मोदीजींनी घेतले. आपण सर्व खूप मेहनत घेऊन आपले स्वतःचे स्थान ओळख निर्माण करीत आहात, त्यामुळे आपला खरा सन्मान व्हावा आपला आशीर्वाद प्राप्त व्हावे यासाठीच हा नारीशक्ती सन्मान सोहळा आयोजित केला असे खासदार अशोक नेते यांनी महिलांशी संवाद साधताना बोलले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उपराडे, माजी आमदार संजय पुराम, व अन्य अतिथीनी मार्गदर्शन केले. दरम्यान विविध गटातील महिला भगिनींनी सुंदर अश्या लेझीम द्वारे गाण्याचे सादरीकरण केले.