परवानगी मिळावी म्हणुन देवरी येथील भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गट देवरी ठाणेदार याच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन देवरीः- (दि.23/02/2023) भारत मुक्ती मोर्चा यांच्या माध्यमातुन २५ फेब्रुवारी २०२४ ला राज्यस्तरीय महामेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यामध्ये शासनाच्या चुकी मुळे सामान्य लोकांच्या सांविधानिक अधिकार समाप्त करण्याचे षढयंत्र होत आहे त्यासाठी विद्यार्थी,पालक,प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,शाळा,संस्थाचालक,शेतकरी,अंगनवाडी सेविका,आशा वर्कर,स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी,पोलिस भरती तयारी करणारे तरुण,युवा बेरोजगार या सर्वांनी एकत्र येवुन सांविधानिक हक्क व अधिकार वाचविण्यासाठी लढा दिला पाहीजे. शाळा वाचवा – शिक्षण वाचवा -शिक्षक वाचवा अभियांनांतर्गत सर्व प्रकारच्या शोषणकारी कंत्राटी भरतीच्या विरोधात महामेळाव्यासाठी एमएमआरडीएचे मैदान उपलब्ध करण्यास टाळाटाळ करणा-या बीकेसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व एमएमआरडीएचे अधिका-यांवर कारवार्ई करण्याचे आंदोलन संपुर्ण महाराष्ट्रात केल्यामुळे अखेर आजाद मैदान मुंबई येथे राज्यस्तरीय महामेळाव्याला परवानगी मिळाली. करुणा नंदागवळी,आनंदराव सतदेवे,विलास चाकाटे,वंदना डोंगरे,मंजुषा विजय वासनिक,आरती नांगळे,कैलास वैद्य,अरुणा शहारे,करणसिंह नागपुरे,संजय मेंढे,राजकुमार हरिदास बंन्सोड,दिलीप जुडा,प्रशांत मेश्राम,आर.जी.नागदेवे उपस्थित होते.