गोंदियाः- (दि.२२/०२/२०२४) गोंदिया जिल्ह्यातील संपुर्ण ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेने विविध मागण्यासाठी बेमुदत काम बंद आंदोलन करुन शासनाने आमच्या १२ वर्षापासुन कोणत्याही मागण्या पुर्ण केल्या नाही त्या पुर्ण करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्राचे काम बंद होते.ग्रामपंचायत मधुन एका संगणक परिचालका मागे १२३३१ रु दर महिण्याला कंपनीला दिल्या जाते पण कंपनी प्रत्यक्षात संगणक परिचालक यांना ६९३०/- देते ते पण दरमहिण्याला मिळत नाही म्हणुन ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेने हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सलग ७ दिवस लढा दिला.त्याच्यात शासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे पुन्हा ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेने आमरण उपोषण करण्याचे ठरवुन त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या नागपुर मध्ये संविधान चौकात २४/०१/२०२४ पासुन आमरण उपोषण सुरु केले.सलग ५ दिवस आमरण उपोषण केल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी निर्णय देण्याचे ठरविल्यामुळे संघटनेने आपल्या आंदोलनाला तात्पुरता स्थगित करुन ग्रामपंचायतचे काम सुरु करण्याचे ठरविले आहे. शासनाने कोणत्याही प्रकारच्या संघटनेचे नाव न देता सरसकट आमच्या मानधनात वाढ करुन देण्याचे घोषणा करुन पत्र संघटनेला द्यावे असे मत ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे आहे.(राज्य सचिव – जितेंद्र साखरे)
