साखरीटोला-: (रमेश चुटे)
जिल्हा परिषद हायस्कूल साखरीटोला येथील 24 विध्यार्थिनीना माध्यमिक शिक्षण विभागाकडून मानव मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थिंनींना आपल्या गावातून दुसऱ्या गावातील शाळेत जाण्यासाठी पायपीट करीत जावे लागत होते. शाळेच्या वेळेत वाहनांची सोय नसलेल्या मुलींना पायपीट करावी लागत होती. यासाठी राज्य शासनाने मानव विकास मिशनअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद हॉयस्कूल साकरीटोला येथील विद्यार्थीनींना सायकल वाटप करते वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुपाल बहेकार प्राचार्य मेश्राम, माजी उपसरपंच अफरोज पठाण, शिक्षक कापगते, लांडगे, सुनील पवार, मंगेश दोनोडे, सराटे, रवी पडोळे व विध्यार्थी उपस्थित होते. सायकल खरेदी करिता शासनाकडून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला निधी देण्यात येतो. प्रत्येक मुलीला सायकल खरेदी करण्यासाठी त्यांच्या खात्यात 3500 रूपये प्रमाणे जमा केले जातात. मानव विकास मिशनअंतर्गत विद्यार्थिंनींना सायकल वाटप केल्यामुळे शाळेत जाण्यासाठी मुलींची पायपीट थांबली आहे.
