माघ पौर्णिमेला देशाच्या कोनाकोपऱ्यातुन कचारगडला पोहोचले भाविक
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
आदिवासीचे उगमस्थान व श्रध्दास्थान असलेले पारी कोपार लिंगो माँ काली कंकाली देवस्थान कचारगड (धनेगाव) ता. सालेकसा येथील कचारगडच्या यात्रेवर असलेल्या आसाम राज्यातील कोकराझार लोकसभा क्षेत्राचे अपक्ष खासदार नवकुमार सरनिया यांचे 24 रोजी साखरीटोला येथे स्वागत करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्या वंदना काळे, डाँ. संजय देशमुख, सरपंच नरेश कावरे, तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, आदिवासी सेवा सह. संस्थेचे अध्यक्ष हिरालाल, राजू काळे, भजेपारचें सरपंच चंद्रकुमार बहेकार, अग्रवाल शिव ऍड. योगेश अग्रवाल, नवीन तूरकर, डाँ. तूरकर, बबलू बिसेन, मुस्तफा कुरेशी व अन्य उपस्थित होते. कचारगड येथे माघ पौर्णिमा दि. 24 शनिवारला आपल्या पूर्वजाची व पूज्य देवी देवताची पूजा करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केले होते. माघ पौर्णिमा हा दिवस भाविकांसाठी विशेष महत्वाचं दिवस मानला जातो. कोयापुनेम महोत्सवाची सुरुवात गोंडी धर्माचार्य रावेन इनवाते यांनी केले अध्यक्षस्थानी के. पी. प्रधान, गोंड राजे वीरेंद्रशहा उईके यांच्यासह विविध राज्यातील मान्यवर उपस्थित होते. बिहार येथील रमेशशहा भूमिका, मध्यप्रदेश येथील विक्रम परते, कर्नाटक येथील रत्ना उईके, आसाम येथील जहूरचंद, ओडिसा येथील घाशीराम मांझी, तेलंगाणा येथील दौलत कोरेंगा, कांकेर छत्तीसगड येथील देवनंदन प्रधान यांचा समावेश होता. माघ पौर्णिमेच्या दिवसी चंद्र पूर्ण रूपात 16 कलानी परिपूर्ण होऊन प्रगट होतो ज्याचे धार्मिक विशेष महत्व आहे. आपले आराध्य दैवत अदृश्य स्वरूपात पुर्थ्वीवर येतात त्यामुळे त्यांची पूजा व स्मरण करण्यासाठी माघ पौर्णिमेचा दिवस धार्मिक दृष्टीने अत्यन्त महत्वाचे असते. दरम्यान बडादेव पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक प्रवचन दीक्षा समारोह, गोंडवाना महासंमेलन व इतर कार्यक्रमाची रेलचेल असते रात्रीला देशातील इतर राज्यातून आलेले वेगवेगळे आदिवासी कलावंत बांधवाच्या मुला-मुलीचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात विविध पारंपरिक वाद्यसंगीत व गीतांचा, वेशभूषेचा समावेश असलेल्या गोंडी संस्कृतीचे दर्शन घडून आले.
अनेक मान्यवरानी लावली यात्रेत हजेरी, पोलीस विभागाचे कडेकोट बंदोबस्त
पोलीस प्रशासन व स्थानिक समितीच्या समन्वयामुळे भाविकांची प्रचंड गर्दी व्हीआयपी मान्यवराची सतत ये-जा सुरु असून सुद्धा यात्रा शांततेत व शिस्तबद्धपणे सुरु असल्याचे दिसून आले. यात्रेदरम्यान महाराष्ट्र राज्यासह विविध राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, वरिष्ठ अधिकारी, प्रतिष्ठित व्यक्तीची ये- जा दिवसभर सुरु होते. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात आदिवासी बांधवाचे पवित्र श्रद्धा स्थान मानल्या जाणाऱ्या अत्यंत दुर्गम आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कचारगड येथे य 5 दिवस यात्रा भरते. याच कचारगडच्या गुहेतून आदिवासी बांधवचा उगम झाला, अशी आख्यायिका सांगितली जाते. कचारगड येथे दोन नैसर्गिक गुफा आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा म्हणून ओळख आहे.
सालेकसा तालुक्यात कचारगड येथे दरवर्षी ही यात्रा कोयापुणेम पौर्णिमेला भरते. या यात्रेसाठी भारतातील तब्बल 18 राज्यातून आदिवासी बांधव एकत्रित येतात. गेल्या अनेक वर्षांपासून भाविक या ठिकाणी आपली संस्कृती जपत आहेत 5 हजार लोक या गुहेत एकाच वेळेस एकत्र दर्शन घेऊ शकतात. या यात्रेसाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छतीसगड, आंध्रप्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड, उतरप्रदेश, मिझोरम या राज्यातून लाखो भाविक येतात. आपल्या आराध्य देवतेचे म्हणजे ‘पारी कोपार लींगो’ चे दर्शन घेतात.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: कचरागड यात्रेदरम्यान आसामच्या खासदाराचें साखरीटोला येथे स्वागत, ID: 29556
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: कचरागड यात्रेदरम्यान आसामच्या खासदाराचें साखरीटोला येथे स्वागत, ID: 29556
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]