विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या आदिवासी कलावंताचे केले स्वागत
साखरीटोला/सालेकसा:- (रमेश चुटे)
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुका अंतर्गत कचारगड (धनेगाव) येथे आदिवासीचे उगमस्थान व श्रध्दास्थान असलेले पारी कोपार लिंगो माँ काली कंकालीचें देवस्थान असून पाच दिवसाची भरगच्च यात्रा भरत असते.दरम्यान आदिवासी संस्कृतीचें विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आले. यात बडादेव पूजा, धार्मिक प्रवचन दीक्षा समारोह, गोंडवाना महासंमेलन सांस्कृतिक व इतर कार्यक्रमाची रेलचेल होती. सतत पाच दिवस आदिवासी भाविकांची रीघ लागली होती तर रात्रीला देशातील इतर राज्यातून आलेले वेगवेगळे आदिवासी कलावंत बांधवाच्या मुला-मुलीचे सांस्कृतिक कार्यक्रम विविध पारंपरिक वाद्यसंगीत व गीतांचा, वेशभूषेचा समावेश असलेल्या गोंडी संस्कृतीचे दर्शन घडून येत होते. दरम्यान कचारगड यात्रेत येणा-या भाविकांच्या सोयी सुविधेकरिता सन 2006 पासून प्रति वर्षांनुसार यावर्षी सुद्धा जनजाती चेतना समीतीच्या वतीने निशुल्क भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, स्नानगृह व शौचालयाची उत्कृष्ट अशी व्यवस्था करण्यात आले होते. भाविकांच्या सेवेत जनजाती चेतना समीतीचें प्रांत संयोजक प्रकाश गेडाम, जनजाती चेतना परीषद विदर्भ प्रांत ABVP च्या प्रांत मंत्री पायल किन्नाके, जनजाती सुरक्षा मंचाचे प्रांत संयोजक संदिप कोरेत, अध्यक्ष डॉ. नाजूक कुभंरे, उपाध्यक्ष लोकनाथ तितराम, डॉ. धुर्वे, माजी न्यायाधीश प्रकाश उईके, श्री चंद्रवंशी, श्री भावे. संजय कुसराम सतत कार्यरत होते व यांच्या हस्ते मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व अन्य राज्यातील आदिवासी कलावंतांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करून स्वागत करण्यात आले. कचारगड येथील कोयापुनेम महोत्सवात गोंडी धर्माचार्य रावेन इनवाते, के. पी. प्रधान, गोंड राजे वीरेंद्रशहा उईके, बिहार येथील रमेशशहा भूमिका, मध्यप्रदेश येथील विक्रम परते, कर्नाटक येथील रत्ना उईके, आसाम येथील जहूरचंद, ओडिसा येथील घाशीराम मांझी, तेलंगाणा येथील दौलत कोरेंगा, कांकेर छत्तीसगड येथील देवनंदन प्रधान यांचा समावेश होता.
कचारगड यात्रेत अनेक मान्यवरानी लावली हजेरी भाविकांची प्रचंड गर्दी, व्हीआयपी मान्यवराची सतत ये-जा सुरु असून सुद्धा यात्रा शांततेत व शिस्तबद्धपणे पार पडली यात्रेदरम्यान महाराष्ट्र राज्यासह विविध राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, वरिष्ठ अधिकारी, प्रतिष्ठित व्यक्तीनी हजेरी लावले होते. आदिवासी बांधवाचे पवित्र श्रद्धा स्थान असलेल्या कचारगड येथे दोन नैसर्गिक गुफा आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा म्हणून यांची ओळख आहे. या यात्रेसाठी भारतातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छतीसगड, आंध्रप्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड, उतरप्रदेश, मिझोरम अश्या तब्बल 18 राज्यातून लाखोच्या संख्येने आदिवासी बांधव एकत्रित येऊन गेल्या अनेक वर्षांपासून आपली संस्कृती जपत आहेत.