????ना. गिरीष महाजन यांना माजी आमदार संजय पुराम यांचे निवेदन
????मुख्यमंत्री ग्रामसडक योजना-2 शासन निर्णय मुग्रासयो- 2023/प्र. क्र. 436/बांधकाम-4 दि. 15/02/2024 अन्वये रस्त्यांचें कायाकल्प होणार
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे) आमगाव विधानसभा क्षेत्रातील अतीदुर्गम नक्षलप्रभावी भागातील रस्त्याचे बांधकाम मुख्यमंत्री ग्रामसडक योजना-2 अंतर्गत व्हावे यासाठी क्षेत्राचे माजी आमदार संजय पुराम यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन यांना निवेदन दिले आहे. यात आमगाव/देवरी विधानसभा क्षेत्रातील आमगाव तालुक्यातील रा.मा.-335 गोरठा धावडीटोला रस्ता, कोसमटोला असोली रस्ता, करंजी ते इर्री रस्ता, कातूर्ली ते करंजी रस्ता, किडंगीपार ते जवरी रस्ता, चिरचाळबांध ते गुदमा-आवारीटोला रस्ता, ठाणाटोला खुर्सिंपार रस्ता, कोसमटोला ते चिंताटोला- काळीमाती रस्ता,रामा-335 बोदा ते मंगरूटोला रस्ता, रामपूर ते कन्हारटोला भजेपार रस्ता, झालिया ते सावंगी रस्ता, किकरीपार ते नवेगाव, भजेपार रस्ता, सालेकसा तालुक्यातील कावराबांध ते बिंझली, नांनव्हा, घोन्सी रस्ता, तिरखेडी ते मशिटोला रस्ता, पांढरी ते गल्लाटोला रस्ता, आमगाव खुर्द ते नांनव्हा रस्ता, लटोरी ते बाम्हणी रस्ता, झालिया ते चीचटोला रस्ता, कुणबीटोला ते पाऊलदौना रस्ता, देवरी तालुक्यातील रामा-276 आलेवाडा ते मोहगाव रस्ता, रामा-358 तुमडीमेडा ते कुरुझरी रस्ता, एसएच- 06 चिचेवाडा ते शेरपार रस्ता, चिल्हाटी ते मुरमाडी रस्ता, प्रजिमा-25 सलियाटोला रस्ता, इजीमा-99 खामतलाव रस्ता, प्रजिमा-25 ईडकचुव्हा रस्ता बांधकामाला मुख्यमंत्री ग्रामसडक योजना-2 अंतर्गत शासन निर्णय मुग्रासयो- 2023/प्र. क्र. 436/बांधकाम-4 दि. 15/02/2024 अन्वये, लवकरच प्रशासकीय/ तांत्रिक मंजुरी मिळणार असून वरील 25 रस्ते गूळगुळीत होणार आहेत असे आस्वासन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. गिरीष महाजन यांनी माजी आमदार संजय पुराम यांना यावेळी दिले. आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बहुल नक्षल प्रभावी क्षेत्रातील रस्त्याची अत्यन्त दयनीय अवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे नागरिकांना मोठात्रास सहन करून प्रवास करावे लागत आहे. सदर रस्त्यावर अनेक अपघात घडले असून, रुग्णांना ने-आन करतांना तारेवरची कसरत करावी लागत असते या रस्त्यांना यात प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागातील रस्ते गुळगुळीत व्हावे नागरिकांना सुविधा मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. मंजुरी व निधी प्राप्त झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्षात रस्ता कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.