- साखरीटोला/सालेकसा-:
नागपूर येथील यशवंत स्टेडियम मधे 4 मार्च 2024 रोजी भारतीय जनता पार्टीच्या भव्य राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा महोत्सवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व राष्ट्रीय युवा मोर्चाचें अध्यक्ष तेजस्वी सूर्या प्रामुख्याने उपस्थित राहून भाजप युवा मोर्चाचें पदाधिकारी व सभासदांना मार्गदर्शन करणार आहेत राहणार आहेत. भव्य राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभाग घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातुन भाजप युवा मोर्चाचें युवक सज्ज झाले आहेत. दरम्यान पूर्व तय्यारी करिता आज 3 मार्च रोजी क्षेत्राचे माजी आमदार व आमगाव/देवरी विधानसभा क्षेत्राचें निवडणूक प्रमुख संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेतील युवा मोर्चा पदाधिकाऱ्याची नियोजन बैठक पुराडा येथे घेण्यात आले. यावेळी आमगाव तालुका भाजप युवा मोर्चाचें अध्यक्ष शुभम पुंडे, शहर अध्यक्ष भाजयुमो रामभाऊ चक्रवर्ती, सालेकसा तालुका भाजप युवा मोर्चाचें अध्यक्ष देवराम चुटे, देवरी तालुका भाजप युवा मोर्चाचें अध्यक्ष निकेश वालोदे, जिला उपाध्यक्ष आकाश बिसेन,
भाजयुमोचें जिला सचिव टिकेश बोपचे, अरविंद फुंडे, सुनील अग्रवाल, आर. डी. रहांगडाले, सौ. मधू अग्रवाल, व आमगाव विधानसभा क्षेत्रातील भाजप युवा मोर्चाचें पदाधिकारी उपस्थित होते.
Author: Elgar Live News
Post Views: 206