????एसआरबी महिला महाविद्यालय सालेकसाचे सात दिवसीय रासेयो श्रमसंस्कार शिबीर थाटात
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
शिक्षण क्षेत्रातून तरुणांवर सेवासंस्कार व्हावा, राष्ट्रसेवा घडावी, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात. शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य होत आहे असे उदगार संस्थेचे सचिव राजेंद्र बडोले यांनी व्यक्त केले. ते एसआरबी महिला महाविद्यालयाच्या वतीने आयोजित रासेयोच्या सात दिवसीय निवासी शिबीर कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. पुर्ती बहुद्देशीय संस्था सालेकसा द्वारा संचालित एसआरबी महिला महाविद्यालयाच्या वतीने दि.23 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी पर्यंत मौजा सालेकसा येथे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घघाटन माजी नगरसेवक कृष्णाजी भसारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षता पूर्ती बहुउद्देशीय संस्था सालेकसाचे सचिव राजेंद्र बडोले यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ.सुनीताताई उईक माजी न.प. सदस्य, रामेश्वर येळे जेष्ठ नागरीक, योगराज पटले जेष्ठ नागरीक, प्रा. बिसेन मॅडम महिला महाविद्यालय, गंगभोज मॅडम, रासेयो अधिकारी उपस्थित होते. दिवसाची सुरुवात जागरण व प्रार्थना करून करण्यात आले. तत्पशचात न्याहारी व चहापान, ग्राम स्वच्छता श्रमदान, स्नानसंध्या, भोजन, मैदानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, भोजन, मुल्यांकन व विश्रांती या वेळापत्रकानुसार सात दिवस कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांकडून मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले. विविध विषयावर मान्यवरांचे प्रबोधन आयोजीत करण्यात आले होते. कार्यक्रमाचा समारोप 29 फेब्रुवारी रोजी संस्थाध्यक्ष सौ शालीनीताई बडोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन हुसेन चौधरी मुख्याधापक वीर बिरसा मुंडा आदिवासी आश्रम शाळा, भुषण राऊत प्राचार्य पुर्ती पब्लीक स्कूल, प्रशांत लोथे प्राथ.मुख्या.वीर बिरसा मुंडा आदिवासी आश्रम शाळा, लोकेश चन्ने प्राचार्य पुर्ती पब्लीक ज्युनियर कॉलेज, खुशाल साखरे प्राचार्य खिलेश महाविद्यालय, आकाश डोंगरवार विभाग प्रमुख एसआरबी महिला महाविद्यालय, शर्मा मॅडम, मिश्रा मॅडम, बिसेन मॅडम, क्षिरसागर मॅडम, तिरपुडे मॅडम, अंसारी मॅडम, भिमटे मॅडम, येळे मॅडम, एस.सी. बिसेन मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते. माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये आणि सामाजिक भान ठेवून समाजसेवेसाठी तत्पर असतो. आपले उज्ज्वल भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो म्हणून फूल ना फुलाची पाकळी या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य महाविद्यालयीन युवक करीत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधचिन्हाप्रमाणे आजचा स्वयंसेवक हा बोधचिन्हाच्या आठ आरेनुसार अष्टौप्रहर समाजसेवेसाठी बांधील असून हे राष्ट्र उभारणीसाठी असल्याचे अतिथीनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचन प्रा. गँगभोज मॅडम यांनी केले. संचालन प्रा. धकाते मॅडम यांनी तर उपस्थित्यांचे आभार प्रा. नंदेश्वर मॅडम यांनी मानले.