आमदार निधीतून मोक्षधामात गट्टू लावणे, व मंदिर दुरुस्ती कामाचे शुभारंभ
साखरीटोला-:/ (रमेश चुटे)
आमगाव तालुक्यातील रामपूर (पानगाव) येथे आमदार सहसराम कोरोटे यांच्या स्थानिक विकास निधीतुन रामपूर येथील मोक्षधामात गट्टू लावणे, व मंदिर दुरुस्ती बांधकामाचे भूमिपूजन 4 फेब्रुवारी रोजी आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसरामभाऊ कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ.उषाताई मेंढे, माजी जि.प. सदस्य कमलबापू बहेकार, माजी जि. प. सदस्य व गोंदिया जिल्हा कांग्रेस कमेटीचे महासचिव राजूभाऊ चांदेवार, ग्रामपंचायत रामाटोलाचे सरपंच सौ.प्रमिलाताई चकोले, ग्रामपंचायत पानगावचे सरपंच सौ. मंगलाताई कोरे, अंजोरा ग्रामपंचायतचे सरपंच सौ. सरिताताई डोये, गांधींटोला ग्रामपंचायतचे माजी सरपंच भूमेश्वर मेंढे, सुनिल मोटघरे, शैलेश बहेकार, जितेंद्रजी बहेकार, सौ. लक्ष्मीताई दोनोडे, पालिकराम दोनोडे, श्रीकृष्णजी कावरे, टेकचंद बहेकार, मोक्षधाम समिती व मंदिर समिती रामपूरचे समस्त पदाधिकारी व सदस्य तसेच मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.
