????कुलदेवताच्या आशीर्वादासाठी मासळ येथे गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, व बालाघाट जिल्ह्यातील भाविकांचा समावेश
साखरीटोला/गोंदिया:– (रमेश चुटे) ग्रामदैवत ही संपूर्ण गावाचे दैवत, कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते. कुळ म्हणजे कुटुंबकबिला वाढला की त्या कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत. जरी लोक स्थलांतरित झाले, तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी. कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेलेले विस्तृत कुटुंब. कुलदेवता आणि कुलदेवीची पूजा जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते. त्यांच्या पूजेचा लाभ वंशजांनाही आशीर्वाद स्वरूप मिळतो. प्रत्येकाने आपले कुलदेवता/ कुलदेवीचे पूजन दर्शन प्रामुख्याने केलेच पाहिजे असे वरिष्ठाचे मत आहे. चुटे कुटूंबीयांचे कुलदैवत असलेल्या मौजा मासळ ता. लाखांदूर येथे 8 मार्च 2024 रोजी दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्त विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गोंदिया जिल्ह्यातून गोंदिया, आमगाव, सालेकसा, देवरी अर्जुनी/मोरगाव, सडक/अर्जुनी, भंडारा जिल्ह्यातून भंडारा, पवनी, लाखांदूर, नागपूर, चंद्रपूर, व मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातून चुटे व समकक्ष कुलदैवत असलेले कुटूंबीय पूजन व दर्शनासाठी पोहचल्याने गर्दी झालेली होती. कुलदैवत हे कुळातील लोकांनी पूर्वापार मानलेले व पुजलेले दैवत, आराध्यदैवत हे एकाच कुळातील, परिवारातील लोकांचे वेगळे असू शकते जसे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव होते तर आराध्यदैवत तुळजा भवानीमाता होती, माधवराव पेशवे यांचे कुलदैवत हरिहरेश्वर तर आराध्यदैवत गणपती होते म्हणजे ही दोन्ही दैवतं वेगळी असू शकतात. कुलदेवता आणि कुलदेवी ही संकल्पना हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे असे सांगण्यात येते. कुलदैवत पूजेचा मुख्य फायदा म्हणजे कुलदेवता आणि देवीने एक रक्षा चक्र तयार केले. हे कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक उर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते. कोणत्याही नकारात्मक उर्जेपासून संरक्षण मिळते. ऐक्य राहतं. आध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती होते. आत्मे आणि स्वर्गीय प्राण्यांपासून संरक्षण मिळते. शांतता आणि समृद्धी राहते. निरोगी मुले आणि निरोगी कुटुंब असते. तसेच ओळख नसलेल्या कुटूंबीयांना यानिमित्त भेट व एक दुसऱ्यासी ओळख होत असते. कुणबी समाजात आडनावानुसार अनेकांचे कुल दैवत वेगवेगळे व वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे सांगण्यात येते. आज घडीला अनेकांना त्यांचे कुलदेवता किंवा कुलदेवीबद्दल काहीच माहिती नाही. त्यांनी आपल्या कुलदैवताची माहिती काढून पूजन करावे असे सांगण्यात आले. विस्तारित कुटुंबाचे विभाजन होते तेव्हा ते बहुतेकदा कुलदेवता आणि कुलदेवी पूजा विसरतात. कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्याचा अकाली मृत्यू – त्याने/तिने ही माहिती तरुण सदस्यांना दिली नसावी, धर्म परिवर्तन, कुल मातृभूमीपासून दूरच्या ठिकाणी स्थलांतर. पूर्वजांनी पाळलेल्या मूल्यांचा आदर नाही अशा विविध कारणांमुळे कुलदेवता किंवा कुलदेवी माहित नसते. कुटूंबात सततचे अपघात, अकाली मृत्यू, संपत्तीची हानी, प्रगतीचा अभाव, कायदेशीर समस्या, मुलांचे वाईट मार्गाला जाणे, कुटुंबातील सदस्यांमधील वाद अश्या समस्या कुलदेवताच्या पूजनाने दूर होऊ शकतात. पूर्वजांनी जास्त काळ पूजा केली असेल. परंतु कुलदेवतेने दिलेले संरक्षण संपल्यानंतर सहा वर्षांत एक वेळा तर कुलदैवत स्थळी पूजन दर्शन केले पाहिजे अशी मान्यता असल्याचे यावेळी सांगण्यात आले मासळ येथील चुटे कुटूंबीयांचे कुलदेवत स्थळी महाशिवरात्री निमित्य पूजेत चुटे कुटूंबीयाअतिरिक्त अन्य आडनावाचे भाविक सुद्धा उपस्थित होते.