????पाण्याअभावी रब्बीचे धान पीक करपले.
????धान पिकासाठी वेळेवर व योग्य प्रमाणात पाणी पुरवठा करा, शेतकऱ्यांची मागणी
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
ओवारा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शेतीला यावर्षी रोटेशन नियमानुसार उन्हाळी धान पीक लावण्याची परवानगी शेतकऱ्याना देण्यात आले असल्याने संबंधित शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकांची लागवट केले आहे. यामध्ये कारुटोला, हेटी, चीचटोला, सलंगटोला, साखरीटोला येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे. उन्हाळी धान पिकांची लागवड केले पण सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने धान पीक करपले असून हजारो रुपये खर्च करून पीक लागवट करणाऱ्या शेतकऱ्यांवर अत्यन्त वाईट स्थिती येऊन ठेपली आहे. शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री जाऊन पाण्याची वाट बघावी लागते पण शेतात पाणी पोहोचत नसल्याने शेतकरी हतबल झाले असून शेतकऱ्यांनी शेत परिसरातच आपली व्यथा मांडून मागणी केले आहे. यावेळी शेतकरी प्रभाकर दोनोडे, देवराम चुटे, रवी मस्के, भरतराम बोहरे, प्रेम दोनोडे, मोहन बागडे, प्रमोद चुटे, गोविंदराव बागडे, संतोष मेश्राम, हंसराज शिवणकर, छबिलाल बागडे, सुखराम मेश्राम, किसन कोरे, शालीकराम शेंडे, ललित कोरे, गौरीशंकर बागडे, प्रदीप कोरे, कुवरलाल बागडे, शामराव चुटे, हरिकीसन बागडे, खुशाल कोरे, गोपाल कोरे, विजय तांडेकर, माधवराव मोरदेवे, रामचंद बहेकार, अतुल थेर, संतोष चुटे, प्रेमलाल शिवणकर, राजकुमार बागडे, संजय शेंडे, रामलाल जिंदाकुर, पुरुषोत्तम कोरे, अनिल कोरे, प्रकाश शिवणकर, संजय भांडारकर, धनराज भांडारकर, श्यामराव शिवणकर व अन्य शेतकरी उपस्थित होते. धान पिकासाठी वेळेवर व योग्य प्रमाणात पाणी पुरवठा करावा अशी मागणी ओवारा प्रकल्पचे कार्यकारी अभियंता यांना केले आहे.