????आशा सेविकांना आता मिळणार दरमहा 13 हजार रुपये मानधन
????डॉ.परिणय फुके यांनी महाराष्ट्र सरकारचे मानले आभार
साखरीटोला/गोंदिया -:
आज 13 मार्च रोजी मुंबई मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्यातील आशा वर्कर्सच्या मानधनात 5000 रुपयाची भरीव वाढ करून त्यांना न्याय देंण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेचा कणा समजल्या जाणाऱ्या आशा सेविकांच्या मानधनात आज शासनाने वाढ करून न्याय दिला दिल्याबद्दल राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, यांचे माजी मंत्री डाँ. परिणय फुके यांनी आभार मानले आहे. गेल्या काही दिवसांपासून आशा सेविकांनी मानधन वाढीची मागणी केले होते. आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावे या संदर्भात माजी मंत्री डाँ. परिणय फुके यांनी सतत पाठपुरावा केले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक व समाधानकारक आश्वासने देऊन मानधनात वाढ करण्याचे मान्य केले होते. आज सरकारने आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा शासन निर्णय घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महिला सशक्तिकरण मोहिमेला बळ देत महाराष्ट्र सरकारने महिला शक्तीला मजबूत करण्याचे काम केले आहे. आता ८ हजारहून आशा वर्कर्सच्या मानधनात ५ हजारांनी वाढ केल्याने त्यांना दरमहा १३ हजार रुपये मानधन मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे आशा वर्कर्समधून स्वागत होत आहे. आशा बहिणींनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, यांचे आभार मानले.