????युवा कुणबी समाज सेवा समिती साखरीटोलाच्या वतीने राज्य सरकारचे अभिनंदन
साखरीटोला/साखरीटोला-: (रमेश चुटे) शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ करून 25 हजार रुपये करण्याचा निर्णय दिनांक 13 मार्चच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. यापूर्वी सामुहिक सोहळ्यात विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्याला वधूच्या विवाहांसाठी मंगळसुत्र व इतर वस्तुंच्या खरेदीकरिता प्रत्येक जोडप्याला 10 हजार रुपये अनुदान मिळत होते. त्याचप्रमाणे सामुहिक विवाह सोहळा राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 2 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते होते. मात्र आता सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना 25 हजार रुपये, आणि सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या संस्थांना 2500 रुपये अनुदान मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्याना भरीव मदत होणार आहे. शुभमंगल योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान डीबीटी पद्धतीने थेट वधूच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राज्य सरकारच्या या योग्य निर्णयाबद्दल युवा कुणबी समाज सेवा समिती साखरीटोला तालुका सालेकसाचे पदाधिकारी प्रभाकर दोनोंडे, भूमेश्वर मेंढे, रमेश चुटे, कमलबापू बहेकार, युगराम कोरे, देवराम चुटे, पुर्थ्वीराज शिवणकर, डाँ. संजय देशमुख, राजू काळे, शामलाल दोनोंडे, प्रेम कोरे, व अन्य सदस्यांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त करून अभिनंदन केले आहे.
![]()
