गोंदियाः- लोकसभेच्या निवडणुका समोरच्या महिण्यात लागण्याची शक्यता आहे.लोकसभा लढविणा-या उमेदवार नेमका काय अजेंडावर निवडुणका लढविणार आहेत त्यावर संपुर्ण भारतवासिंयाचे लक्ष लागले आहे.आज केेंद्रात भाजप सरकार आहे.ह्या सरकारने जनतेच्या प्रश्नाबाबद किती जागृत राहुन कामे केलेले आहे.त्यावर जनता ठरविणार आहे. निवडणुका झाल्यापासुन साडे चार वर्ष सामान्य लोकांना कधीच कोणत्याच पक्षाचे फोन येत नव्हता पण आता प्रत्येक घरापर्यंत फोन येतो योजना भेटल्या की नाही.मोदी सरकार पासुन समाधान आहात की नाही अशा पध्दतीने फोन येत आहे.आता प्रत्येक पक्षाला सामान्यांची चिंता वाटणे सुरु झालेले आहे.आता गरीबांना सर्वच गोष्टी दिल्या जातील.त्यांना लुभविल्या जाईल. भारतातील जनता आपल्या मताचा अधिकार कुणाला देणार हे जनता ठरविणार.




