महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत कर्मचारी,संगणक परिचालकांचा विचार करावा मुंबईः- महाराष्ट्र शासनाने गावातील जे आशा वर्कर,पोलिस पाटील,आंगनवाडी सेविका यांच्या मानधानात दुप्पटीने वाढ केली आहे.जे कर्मचारी संपुर्ण एक ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी एका टोल्यावर एक आशा वर्कर,पोलिस पाटील,आंगनवाडी सेविका असते.त्यांचा विचार सरकार करते.मग जे ग्रामपंचायत कर्मचारी ,संगणक परिचालक हे संपुर्ण ग्रामपंचायत मधील काम सांभाळुन संपुर्ण टोल्याचे काम करतात. गावातील मुख्य भुमिका बजावणारा ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक परिचालक यांच्या कडे दुर्लक्ष एका ग्रामपंचायत मध्ये कमीत कमी 4 आशा वर्कर,4 पोलिस पाटील,6 आंगनवाड्या यांचे संपुर्ण काम ग्रामपंचायत मधील कर्मचारी व संगणक परिचालक करतात त्यावर सरकार लक्ष देत नाही.जर ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक परिचालकांना सरकार डावलेल तर गावाचा विकास होईल का?सरकार ने ग्रामपंचायत मधील कर्मचारी, संगणक परिचालकांचा विचार करुन सरकारने न्याय द्यावा. मनोहर मेश्राम(कर्मचारी) जिंतेद्र साखरे (संगणक परिचालक ) महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना
