Published:

पर्यावरण संरक्षणासाठी निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन

????सामाजिक वनीकरण परीक्षेत्र आमगावचे उपक्रम
????निबंध स्पर्धेत गवराबाई हायस्कुल झालीयाची कु. मानसी कुराहे प्रथम, तर चित्रकला स्पर्धेत विवेकानंद हायस्कुलची कु.डिंपल खंडाये प्रथम,
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
सालेकसा तालुक्यातील गवराबाई हायस्कुल झालिया येथे 12 मार्च रोजी विध्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे धडे देण्यासाठी निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.”‘पर्यावरण वाचवाल तर वाचाल’” हे विद्यार्थ्याना पटवुन देण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग गोंदिया अंतर्गत आमगाव परीक्षेत्रातील सालेकसा तालुक्यामध्ये राष्ट्रीय हरीत सेना इको क्लबच्या वतीने तालुकास्तरीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रमानव्ये निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आले होते. यात एकुण 18 इको क्लब शाळांनी भाग घेतला होता निबंध स्पर्धेत कु. मानसी मुन्नालाल कुराहे वर्ग 9 वा गवराबाई हायस्कुल झालीया हिने प्रथम क्रमांक पटकवीला आहे तर कु. साक्षी लखनलाल बिसेन वर्ग 9 वा नारायणभाऊ हायस्कुल लोहारा हिने दृतीय क्रमांक प्राप्त केला आणि कु. गायत्री राऊत वर्ग 11 वा शासकीय आश्रम शाळा बिजेपार हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. चित्रकला स्पर्धेत कु.डिंपल टेकचंद खंडाये वर्ग 9 वा विवेकानंद हायस्कुल सोनपुरी हिने प्रथम क्रमांक पटकवीला आहे, तर कु.अक्षरा भांडारकर 10 वा पंचशिल हायस्कुल मक्काटोला हिने दृतीय क्रमांक प्राप्त केला आणि कु. मोहीनी वटटी वर्ग 9 वा शासकीय आश्रम शाळा बिजेपार हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेत यशस्वी झालेल्या विध्यार्थ्यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. विध्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून के.टी.नवघोडे सरपंच झालीया, वाय. बी. सोनटक्के वनपाल सामाजिक वनीकरण परीक्षेत्र आमगाव, ए.के.ढेकवार प्राचार्य गवराबाई हाय. झालीया, के.पी. ब्राह्मणकर, श्रीमती वेदिका दशरिया, बी.पी. बनोठे, बिसेन सर, नागपुरे सर, कु. एल.जे.लांजेवार वनरक्षक, कु. एस.बी. बागडे वनरक्षक, एम.आर. येळे वनमजुर व सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व सामाजिक वनीकरणचे कर्मचारी यांनी सहकार्य केले. संचालन शिक्षक व्ही.एच. तांडेकर यांनी केले तर उपस्थिताचे आभार कु. एल.जे. लांजेवार वनरक्षक यानी मानले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: पर्यावरण संरक्षणासाठी निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन, ID: 29690

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर