Published:

पर्यावरण संरक्षणासाठी निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन

  • ????निबंध स्पर्धेत आरएचएस तुकाराम हायस्कुल भोषाची सेजल भालाधरे प्रथम,
  • ????चित्रकला स्पर्धेत विद्यानिकेतन हायस्कुलआमगावची श्रुती खोब्रागडे प्रथम,
  • ????सामाजिक वनीकरण परीक्षेत्र आमगावचे उपक्रम

साखरीटोला/सालेकसा-:(रमेश चुटे)
पर्यावरण संरक्षण हा आजच्या समाजाचा अविभाज्य भाग आहे, परंतु आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ते काय करू शकतात याविषयी अनेकांना मूलभूत माहितीही नसते. पर्यावरणाचा नाश आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास या महत्त्वाच्या समस्या आहेत. हे पटवून देण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग गोंदिया अंतर्गत आमगाव परीक्षेत्रातील राष्ट्रीय हरीत सेना इको क्लबच्या वतीने आमगाव येथील विद्यानिकेतन हायस्कूल मधे 13 मार्च रोजी विध्यार्थ्यांसाठी पर्यावरण संरक्षण संदर्भात निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात एकुण 13 इको क्लब शाळा व महाविद्यालयांनी भाग घेतला होता निबंध स्पर्धेत कु. सेजल रुपेशकुमार भालाधरे वर्ग 9 वा आरएचएस तुकाराम हायस्कुल भोसा हिने प्रथम पाटविला, तर कु. आर्या लुकेश्वर गौतम वर्ग 9 वा हरिहरभाई पटेल स्कुल चिरचाळबांध हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केले, तसेच कु. श्रृती महेश मेंढे वर्ग 9 वा विद्यानिकेतन हायस्कुल आमगाव हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. चित्रकला स्पर्धेत कु. श्रृती सुरेन्द्र खेाब्रागडे वर्ग 9 वा विद्या निकेतन हायस्कुल आमगाव हिने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केले असून कु. दामीनी आर. मेंढे 9 वा जि.प. हायस्कुल कटटीपार हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केले तर सुदेश कन्हैय्यालाल टिकरीया वर्ग 9 वा आदर्श विद्यालय आमगाव याने तृतीय क्रमांक पटकवीला आहे. स्पर्धेतील यशस्वी विध्यार्थ्यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राजेन्द्र गौतम सभापती पं.स.आमगाव, ए.के. मडावी वनपरीक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण परीक्षेत्र आमगाव, वाय. बी. सोनटक्के वनपाल सामाजिक वनीकरण परीक्षेत्र आमगाव, पी.बी. भक्तवर्ती प्राचार्य विद्यानिकेतन हायस्कूल आमगाव, बी.वाय. कुंभलवार सर, एस. रहांगडाले सर, आर.एस. वैष्णव सर, कु.एस.बी. बागडे वनरक्षक, कु. एल.जे. लांजेवार वनरक्षक, एम.आर येळे, शिक्षक व सामाजिक वनीकरणचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, व सामाजिक वनीकरणचे कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक आर.एस. वैष्णव यांनी केले तर उपस्थिताचे आभार कु.एस.बी. बागडे वनरक्षक यानी मानले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: पर्यावरण संरक्षणासाठी निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन, ID: 29693

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर