Published:

20 पर्यंत शिक्षक द्या, अन्यथा शाळेला कुलूप ठोकणार- शाळा समिती व गावकऱ्याचा एल्गार

???? अधिकाऱ्यांना निवेदन, 20 पर्यत शिक्षक आले नाही तर 21 मार्चला कुलूप ठोकून शाळा बंद पाडण्याचा इशारा
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
सालेकसा तालुक्यातील हलबीटोला (पिपरिया) येथे जिल्हा परिषदेची हिंदी पूर्व माध्यमिक शाळा असून गाव परिसरातील गोर गरीब विध्यार्थी वर्ग 1ली ते 7 वी पर्यंतचे शिक्षण घेत असतात मात्र वार्षिक परीक्षा येऊन ठेपली असतांनाच गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 13 मार्च रोजी शाळेतील सर्व पाच ही शिक्षकांची बदली करून दुसऱ्या दिवशी फक्त दोन नवीन शिक्षक पाठवले आहे. कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची बदली करण्यापूर्वी तेथील व्यवस्था पूर्ववत कशी करता येईल याची दक्षता घेण्यात येते मात्र असं न करता शाळेतील सर्व शिक्षकांची बदली करून देण्यात आल्यानंतर येथे दोन नवीन शिक्षक पाठविण्यात आले. त्यांना येथील व्यवस्था समजून घेण्यास वेळ लागेल आणि तोंडावर वार्षिक परीक्षेचे तान येऊन पडले असल्याने पालकांना आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक भविष्याची चिंता होऊ लागली आहे.अति दुर्गम आदिवासी बहुल नक्षल प्रभावित क्षेत्रातील हिंदी पूर्व माध्यमिक शाळा हल्बीटोला (पिपरिया) येथे अती दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी शेतकरी कुटुंबातील विध्यार्थी शिक्षण घेत होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न सुरु असतांनाच दिनांक 13 मार्च रोजी अचानक येथील सर्व शिक्षकांची बदली करून दोन नवीन शिक्षक पाठविण्यात आल्याने पालकांमध्ये रोष निर्माण झाला असून शाळा व्यवस्थापण समिती व गावकऱ्यानी 15 मार्च रोजी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., शिक्षण अधिकारी प्राथ. तहसीलदार सालेकसा, गटविकास अधिकारी पस सालेकसा, गट शिक्षणाधिकारी, पोलीस निरीक्षक सालेकसा यांना निवेदन देण्यात आले असून 20 मार्च पर्यत शिक्षक द्या, अन्यथा 21 मार्च रोजी शाळेला कुलूप ठोकू असा सरळ इशारा देण्यात आले आहे. निवेदनात 20 मार्च पर्यंत शाळेतील रिक्त सर्व शिक्षकांची जागा भरा अन्यथा 21 मार्चला शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद करु दरम्यान काही कमी जास्त झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद आहे. निवेदन देते वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणराज कोरोटे, उपाध्यक्ष दुलीचंद दशरिया, सदस्य तथा उप-सरपंच गुणाराम मेहर, सदस्य राजेंद्र राऊत, पालक खुशाल रतोने, लखन दमाहे, मदनलाल सुलाखे, रुकेश दमाहे, परदेसी मानकर व गावकरी उपस्थित होते.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: 20 पर्यंत शिक्षक द्या, अन्यथा शाळेला कुलूप ठोकणार- शाळा समिती व गावकऱ्याचा एल्गार, ID: 29707

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर