देवरीः- (दि.१९-०३-२०२४) हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारपीट झाली . या वादळी वारा व पावसाचा शेती पिकांना मात्र फटका बसत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे.त्यातच गोंदिया जिल्ह्यासह जिल्ह्याच्या काही तालुक्यात पुन्हा अवकाळी वादळी पावसानं चांगलेच झोडपून काढलं आहे. या अवकाळी पावसामुळं अनेक भाजीपाला फळ पिकाचां मोठा नुकसान झाला आहे. तर खुल्यावर असलेल्या शेतमाल भिजला आहे. आधीच शेतकऱ्यांचे खरीप हंगामात अतिवृष्टीमुळं आणि आता अवकाळी वादळी पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे.जिल्ह्यातील देवरी, आमगाव, सालेकसा , गोरेगाव, गोंदिया, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी या आठही तालुक्यात मागील आठवडा भरापासुन ढगाळ वातावरणासह वादळी वारा व अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या अवकाळी पावसामुळे भाजीपाला , फळ पिक व शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. चन्ना , गहु ,उडीद,तुळ,सांभार,लाकोळी हे पिके हातात येवुन पाऊसामुळे ओले झाले आहेत.देशात किती ही प्रगती झाली तरी शेतकरी वर्गाला निसर्गाचा प्रकोप हा सहन करावा लागतोच.शेतकरी चिंतेत पडला आहे.
![Elgar Live News](https://secure.gravatar.com/avatar/74fb4f4b083185b668967fec198f3e1b?s=96&r=g&d=https://elgarlivenews.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)