लाचखोर पशुधन अधिकारी व वाहन चालक एसीबीच्या जाळ्यात शेळी पालन अनुदानासाठी लाभार्थ्याला मागीतली होती लाच
सालेकसा :- (सुरेंद्र खोब्रागडे) शेळी पालन अनुदानासाठी लाभार्थ्याला दुसरा हप्ता काढण्यासाठी पशुधन अधिकारी सालेकसा सरोज बावनकर यांनी पाच हजार रुपये लाच मागितली होती. यात सालेकसा येथील शेतकरी लाभार्थी याचा मराठवाडा पॅकेज अंतर्गत शेळी पालन करिता निवड करण्यात आली होती.यात शेळी खरेदी करिता लाभार्थी याला पहिला हप्ता ५७३५० रूपये निधी धनादेश वाटप करण्यात आले होते. यातील दूसरा हप्ता काढण्यासाठी पशुधन अधिकारी सरोज बावनकर यांना लाभार्थी याने विनंती केली होती परंतु दुसऱ्या हप्त्याचे ५७३५० रुपये अनुदान धनादेश काढण्यासाठी पशुधन अधिकारी सरोज बावनकर यांनी लाभर्थ्याकडे पाच हजार रुपये लाच मागितली होती.
लाभार्थी शेतकरी यांना लाच द्यायची नव्हती म्हणून लाभार्थी यांनी जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार सादर केले.त्यानुसार
दिनांक १८ मार्चला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच प्रकरणाची खातरजमा करून सापळा रचून पशुधन अधिकारी सरोज बावनकर व वाहन चालक भुवनेश्वर चौहान याला लाच रकमेतील चार हजार रुपये स्वीकारताना अटक केली . याबाबद आरोपी विरुध्द सालेकसा पोलीस ठाणे येथे प्रकरण दाखल करण्यात आले. सदर प्रकरणात गोंदिया जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राहुल माकनीकर,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन कदम,संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक विलास काळे, पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, पोलीस निरीक्षक अतुल तवाडे,चंद्रकांत करपे,संतोष बोपचे,संतोष शेंडे,प्रशांत सोनवाने,संगीता पटले,दीपक बाटबर्वे सह विभागातील कर्मचारी यांनी कार्यवाही केली.
![Elgar Live News](https://secure.gravatar.com/avatar/74fb4f4b083185b668967fec198f3e1b?s=96&r=g&d=https://elgarlivenews.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)