मुंबईः- पोलिस भरती -२०२३ मधील पोलिस शिपाई संवर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळविण्यात येत आहे की, दि.३१-०३-२०२४ पर्यंत आवदेन अर्ज सादर कऱण्याबाबद Mahait यांच्या संकतेस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असुन त्यांची अंमलबजावणी प्रक्रीया शासन स्तरावर सुरु आहे.त्याप्रमाणे उमेदवारांना SEBC प्रमाणपत्र मिळणेस विलंब लागत आहे म्हणुन सर्व उमेद्वारांना आवेदन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक १५-०४-२०२४ करण्यात येत आहे. अंतिम दिनांकापुर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास,अशा उमेदवारांना प्रमाणपत्र मिळणेसाठी केलेला अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा.मात्र कागदपत्र पडताळणीवेळी त्यांचेकडे विहीत नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
