गडचिरोली येथे चामोर्शी रोडवर भाजपच्या जनसंपर्क निवडणूक कार्यालयाचे शुभारंभ
गडचिरोली/ सालेकसा-: भारतीय जनता पार्टी, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय-पिरिपा
महायुतीचे गडचिरोली/चिमूर लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार अशोक महादेवराव नेते यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन 27 मार्च रोजी लोकसभा प्रभारी अतुलभाऊ देशकर यांच्या हस्ते गडचिरोली येथील चामोर्शी रोडवर करण्यात आले आहे. यावेळी खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार डॉ. देवराव होळी, लोकसभा प्रभारी तथा माजी आमदार अतुलभाऊ देशकर, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, माजी आमदार डॅा.नामदेवराव उसेंडी, डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदाताई कोडवते, डॉ. मिलिंद नरोटे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भूरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा संघटनमंत्री संजय गजपुरे, महिला मोर्चाच्या जिल्हाअध्यक्षा गिताताई हिंगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, सहकार प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर उपस्थित होते. प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी खासदार अशोक नेते म्हणाले की. देशात काँग्रेसनी पन्नास साठ वर्ष राज्य केल. परंतु जे काँग्रेस ला जमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दहा वर्षात ऐतिहासिक निर्णय घेत देशाला पुढे नेण्याचं काम केले. त्यांनी पाचशे वर्षाचा राम मंदिराचा प्रश्न, तीन तलाख, काश्मिर ३७० धारा, असे अनेक धाडशी निर्णय घेतले. केलेल्या कार्य कर्तुत्वावर प्रधानमंत्री यांचे स्वप्न विजयाचा संकल्प असून अब कि बार चारसौ पार असा विजय संकल्प घेतला आहे ते आम्ही पूर्ण करू. मी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्रातुन अनेक विकास कामे आणले. ज्यात रेल्वे, सिंचन, रस्ते, केंद्रीय विद्यालय, एकलव्य विद्यालय, मेडिकल कॉलेज, सुरजागड लोह प्रकल्प, हवाई पट्टीचा प्रस्ताव. एवढंच नाहीतर रेल्वे सर्व्ह लाईनचे काम मंजूर केले असून वडसा गडचिरोली रेल्वे लाईन चे काम प्रगती पथावर आहे. असे उदगार खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केले लोकसभा प्रभारी व माजी आमदार अतुल भाऊ देशकर यांनी प्रचार कार्यालयाच्या उदघाटना प्रसंगी प्रधानमंत्री मोदी यांनी केलेल्या कार्य कौशल्यावर लोकप्रियता मिळाली, एवढी लोकप्रियता कोणालाही मिळाली नाही. बोले तैसा चाले त्याची वृंदावी पाऊले असे कार्य करत भारताची अर्थव्यवस्था बळकट करत जगात तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा काम केलं. मोदी जी की गॅरंटी है अभिमानाची ज्योत अशीच तेवत तिसऱ्यांदा अशोकभाऊ नेते यांना बहुमताने विजयी करायचा आहे असे मत व्यक्त केले. माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी यांनी आपले विचार व्यक्त करतांना पंतप्रधान मोदींच्या कार्यकर्तृत्वाला पाठिंबा द्या. देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती म्हणून पहिल्यांदा आदिवासी महिला द्रौपदी मुर्मूजी हे विराजमान झाले. आदिवासी समाजासाठी हे अभिमानास्पद आहे. प्रधानमंत्री मोदी यांची प्रथम राष्ट्र ही भूमिका असून असून त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने प्रभावित होऊन मी भाजप पक्षात प्रवेश केला.अब की बार चारसौ पार नक्की होणार असून गडचिरोली लोकसभा क्षेत्रातून अशोक नेते हे निश्चित विजयी होतील व चार सौ पार मधे गडचिरोली क्षेत्राचा मोठा सहभाग राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, डॉक्टर चंदाताई कोडवते, डॉक्टर नितीन कोडवते, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी ही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
