Published:

 शिवाजी महाराज हे जगातील अतुलनीय व्यक्तिमत्व होते- जिल्हा शिवसेना प्रमुख सुरेंद्र नायडू 

????छत्रपती शिवाजी महाराजाच्या जन्मोउत्सवानिमित्य समाजसेवेत अग्रगण्य संघटना व विविध क्षेत्रातील समाजसेवकांचा सत्कार

सालेकसा /साखरीटोला-: (रमेश चुटे) छत्रपती शिवरायांची तुलना फक्त त्यांच्या बरोबरच होवू शकते,त्यामुळेच ते जगातील अतुलनीय व्यक्तिमत्व होते,असे मत गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख सुरेंद्रजी नायडू यांनी बोलताना व्यक्त केले. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सालेकसा जिल्हा गोंदिया येथे 28 मार्च रोजी (तिथीनुसार) शिवाजी जन्मोउत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजाच्या जन्मोउत्सव कार्यक्रमाचे उदघाटन गोंदिया जिल्हा शिवसेना शिंदे गट प्रमुख सुरेंद्र नायडू यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा पर्यवेक्षक आशिष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा समन्व्यक डाँ. हिरालाल साठवणे, जिल्हा महिला प्रमुख सौ. मायाताई शिवणकर, जिल्हा युवासेना प्रमुख अर्जुनसिंग बैस, तालुका प्रमुख विजय नागपुरे, आमगाव तालुका प्रमुख अनिल सोनकनेवरे, तालुका समन्व्यक किसन रहांगडाले, शहर प्रमुख राहुल साठवणे, महिला तालुका प्रमुख सौ. पंचशीला वैध, महिला आमगाव तालुका प्रमुख रुपाली पिंजरकर, संजू देशकर, अतुल चौहान, सोनू दशरीया, ताराबाई नागपुरे, नूतनबाई लिल्हारे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आई माँ दुर्गा भवानी, धर्मविर आनंद दिघे साहेब यांच्या चित्रासमक्ष दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आले. याप्रसंगी महात्यागी सेवा संस्था तिरखेडी आश्रमचे संत ज्ञानीदास महाराज, सालेकसा तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, सागर काटेखाये, राजेंद्र बडोले, राजू फुंडे, हेमंत शर्मा, राहुल साठवणे, सालेकसा पत्रकार संघांचे अध्यक्ष यशवंत शेंडे, मायकल मेश्राम, बाजीराव तरोने, गुणाराम मेहर, रवी सोनवाणे, बनोठे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे विजय मानकर, गणेश भदाडे, राकेश रोकडे, इलेक्ट्रो होमियोपेथी असोशियशनचे डाक्टर्स, विठ्ठल सत्संग आश्रम बोडलबोडीचे संत माधोराव खोटेले, मोक्षधाम सेवा समितीचे सुनील असाटी, डाँ. शैलेश भसे, उत्कृष्ट समाज सेवक ब्रजभूषण बैस, समाज सेविका वंदनाताई भालाधरे, गडमाता सेवा समितीचे अध्यक्ष, उत्कृष्ट समाज सेवक शंकरलाल मडावी, आशासेविका व गट प्रवर्तक, अर्धनारेश्वरालंय शिवगण सेवा ट्रस्ट हलबीटोला, शिव व्याख्यात त्रिवेणी हत्तीमारे, एएसआय संजय चौबे, सरपंच चंद्रकुमार बहेकार, श्रीमती हनीजी दर्डा व समस्त समाजसेवकांचे त्याच्या विविध क्षेत्रातील सामाजिक चळवळीतील योगदानाबद्दल स्मृतीचिन्ह, शाल श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी शिव व्याख्यात्या त्रिवेणी हत्तीमारे यांनी आपल्या मार्गदर्शनात छत्रपती शिवरायांचे कृषी धोरण, महिलांविषयीचा दृष्टीकोन, युध्दनिती, चातुर्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, संदर्भात उत्कृष्ट प्रबोधन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचन मायाताई शिवणकर यांनी केले, सूत्रसंचालन डाँ. हिरालाल साठवणे यांनी तर उपस्थिताचे आभार अर्जुनसिंग बैस यांनी मानले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post:  शिवाजी महाराज हे जगातील अतुलनीय व्यक्तिमत्व होते- जिल्हा शिवसेना प्रमुख सुरेंद्र नायडू , ID: 29775

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर