????आमगाव तालुक्यातील तिगांव येथे पंचायत समिती गणांची भाजपा बुथ प्रमुख व वॉरियर्सची सभा
साखरीटोला-: (रमेश चुटे) महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खा. अशोकजी नेते याच्या प्रचारार्थ मौजा तीगांव येथे भाजपा बुथ प्रमुख व वॉरियर्स यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयभाऊ शिवणकर यांनी मार्गदर्शन केले. बोलतांना म्हणाले तिगाव पंचायत समिती गणांतील शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख यांनी गांभीर्याने मतदान यादीचे वाचन करावे. बुथ रचना, पेज प्रमुख, पन्ना प्रमुख, यावर लक्ष देत बुथ संघटन करावे. व महायुतीचे उम्मेदवार अशोक नेते जास्तीत मते मिळू शकतील असे नियोजन करावे अश्या सूचना देण्यात आले. यावेळी जिल्हा ओबीसी आघाडीचे महामंत्री देवेंद्र मच्छीरके, पंचायत समिती सदस्या योगिताताई पुंड, आमगाव तालुका भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष अंजूताई बिसेन माजी जिल्हा परिषद सदस्या हंसाबाई पटले, माजी प.स.सदस्य अशोक पटले, तिगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच नरेंद्र शिवणकर, माजी उपसरपंच अजय बिसेन, माजी सरपंच दीनदयालभाऊ बघेले, यशवंत पुंड व तिगाव पंचायत समिती गणातील वरिष्ठ कार्यकर्ते पंचायत समिती गणांतील भाजपा बुथ प्रमुख, व वॉरियर्स प्रामुख्याने उपस्थित होते.