????सालेकसा येथे तिथीनुसार शिवाजी महाराजांची जयंती तालुका शिवसेना उद्धव गटाचे उपक्रम
साखरीटोला/सालेकसा -: (रमेश चुटे) मानवी जिवन जगत असताना संस्कार महत्वाचे आहे. आणी हे संस्कार केवळ संत महापुरुषांचे विचारातच असते जो ईतिहास विसरतो, तो ईतिहास लिहु शकत नाही. शिवरायांनी तलवारीच्या जोरावर शत्रुंना सळो की पळो करुन विजय मिळवला व रयतेचे राज्य स्वराज्य प्रस्थापीत केले. संत तुकडोजी महाराज यांनी खंजेरीवर भजनाच्या माध्यमातून तरुनांना जागवून स्वातंत्र्य लढ्यात मोठी क्रांती केली, कर्मयोगी गाडगे बाबांनी गावागावात झाडु मारुन गावचेगाव स्वच्छ करुन रात्रीला किर्तनाचे माध्यमातून लोकांना जागवण्याचे महान कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे काळात महिला फारच सुरक्षित होत्या. सोबतच जनता व शेतकरी सुध्दा आनंदात होते. अशा या महापुरुषांचे इतीहास आपन विसरता कामा नये. कारन जो इतिहास विसरतो तो आपले भविष्य घडवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हृदयात ठेवून आचरणात आणावे असे उदगार शिवसेना उद्धव गटाचे जिल्हा उपप्रमुख सोहनभाऊ क्षीरसागर व्यक्त केले. ते 28 मार्च रोजी सालेकसा शिवसेना उद्धव गटाच्या वतीने तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंती कार्यक्रमात उदघाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचें शुभारंभ राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे याच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आले. शिवाजी जयंती निमित्य भजन स्पर्धा, भव्य मोटार सायकल रैली, शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन, मार्गदर्शन, व महाप्रसाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिवसेना तालुका प्रमुख कुलतारसिंग भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उपप्रमुख सोहनभाऊ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून किसान सेना तालुका प्रमुख राधेश्याम मोहारे, भीमसेना प्रमुख अनिल तिरपुडे, तालुका सचिव अनिल शेंद्रे, दिवाकर सोनवाने सुभाष इनवाते, भजनलाल बोपचे, संतोष सुलाखे, पुरुषोत्तम क्षीरसागर, सुखलाल लिल्हारे, जयपाल चौराके, महेश रत्नाकर, आशिष मोहारे, जागेश लिल्हारे, युवराज हेमने, खुशाल रतोने, मोहन क्षीरसागर, आशिष चुटे, मधुभाऊ शिवणकर, श्रीराम लिल्हारे, घनश्यामभाऊ नागपुरे, वंदनाताई क्षीरसागर, उर्मिलाताई क्षीरसागर, रवी खानोरकर, रिताताई क्षीरसागर, लीलाबाई बारसे, देवगुणेताई, शिशुकलाताई बिसेन, कोमलताई, व तालुक्यातील शिवसेनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
![Elgar Live News](https://secure.gravatar.com/avatar/74fb4f4b083185b668967fec198f3e1b?s=96&r=g&d=https://elgarlivenews.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)