Published:

सरपंच व सचिवाच्या संगणमताने पिपरिया ग्रामपंचायत मधे लाखो रुपयांचा गैरव्यवहार

????उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा पत्रकार परिषदेत आरोप

साखरीटोला/सालेकसा-: सालेकसा तालुक्यातील मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यांच्या टोकावर असलेल्या लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या तुलनेत आमगांव-देवरी क्षेत्रात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या पिपरिया ग्रामपंचायतचे सचिव व सरपंचाने आपसात संगणमत करून लाखो रुपयाचा आर्थिक गैर व्यवहार केल्याचा आरोप ग्रापंचे उपसरपंच गुणाराम मेहर व ग्रामपंचायत सदस्यांनी सालेकसा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. दरम्यान पत्रकारासमक्ष पुरावे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीच्या प्रति सादर केले. प्रकरण असे की सालेकसा तालुक्यातील ग्रामपंचायत पिपरियाचे हद्दीत तलाठी साझा. क्र.07 येथे अंदाजे पन्नास एकर जागेत कुकूट पालन केंद्र सुरु करण्यासाठी छत्तीसगढ राज्यातील एक कंपनी एबीस एक्सपोर्ट इंडिया प्रा.लि. इंदामारा, जिल्हा राजनांदगाव (छत्तीसगढ) यांनी सदर जागेत पोल्ट्री फार्म सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय पिपरियाला एक पत्र देऊन ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी केले होते. मात्र ग्रामपंचायतचे उपसरपंच, ग्रापं सदस्य, व ग्रामसभेला विश्वासात न घेता पिपरिया ग्रामपंचायतचे सरपंच व सचिवाने आपसात संगणमत करून आपल्या मनमर्जीने छत्तीसगडच्या संबंधित कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र व सभेचा ठराव दिला आहे. नाहरकत प्रमाणपत्र व ठरावाच्या यामोबदल्यात सरपंच व सचिवाने सदर कंपनीसी लाखो रुपयाचा गैरव्यवहार केला असा आरोप उपसरपंच मेहर, व ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कार्यवाही करण्यात यावे यासाठी विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांच्याकडे 24 नोव्हेंबर 2023 ला तक्रार केले होते. दरम्यान सालेकसा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री पराते यांनी चौकशी केले होते अशी माहिती पत्रकार परिषदेत उपस्थित उपसरपंच गुणाराम मेहर यांनी पत्रकारांना दिली. नियमान्वये नाहरकत प्रमाणपत्र व ग्रामसभेचा ठराव देण्यापूर्वी संबंधित कंपनीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मुंबईच्या नियमानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा पशुधन विकास अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कडून मिळालेले नाहरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायत मधे सादर करावे लागत असते. सादर केल्यानंतर ग्रामपंचायतकडे आलेले नाहरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबदचे अर्ज ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत चर्चेसाठी मांडणे व त्यावर चर्चा करून ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत त्याला मंजुरी प्रदान करणे. व सदर विषय ग्रामसभेच्या विषय सूचित ठेवणे, ग्रामसभेत त्यावर चर्चा करून मंजुरी देणे किंवा नाकारणे आवश्यक असते. परंतु तसे न करता सरपंच व सचिवांनी आपसात संगणमत करून 27 मे 2023 रोजीच्या ग्रामसभा इतीवृत्तांत अध्यक्ष यांच्या परवानगीने येणाऱ्या विषयात नोंद घेऊन सदर कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र व ग्रामसभेचा ठराव देण्यात आले आहे.
गावाच्या जवळ मोठे कुकूट पालन केंद्र असणे आरोग्याच्या दृष्टीने बरोबर नाही भविष्यात पोल्ट्री फार्मचे दुष्परिणाम झाले व परिसरातील पशुधनाच्या आरोग्यावर प्रभाव पडला तर जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले होते. तसेच वित्त वर्ष 2019-20, 2021-22 या सत्रात नागरी सुविधा अंतर्गत झालेल्या विकास कामाची उर्वरित रक्कम 33% टक्के म्हणजेच 28 लक्ष रुपयांच्या जवळपास होती. सदर रक्कम ग्रामपंचायतच्या बॅंक खात्यात येताच अधिकतर रक्कमेची अफरातफर करण्यात आले. सदर प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी म्हणून 01मार्च 2024 रोजी गोंदिया जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे तक्रार करण्यात आले होते. मात्र अजून साधी चौकशी सुद्धा झाली नाही असा आरोप उपसरपंच गुणाराम मेहर यांनी केला आहे. आयोजित पत्रकार परिषदेत उपसरपंच गुणाराम मेहर, पिपरिया ग्रामपंचायतचे माजी सरपंच सौ. मधु अग्रवाल, भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख धिरेंद्र अग्रवाल, ग्रामपंचायत सदस्य राजाराम धांमडे, किशोर उईके, अशोक उईके, सदस्या सौ. कुसमा चोरके, सौ. प्रिती कटरे, सौ. सरिता कोवे उपस्थित होते. सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावे अशी मागणी आहे. चौकशी व कार्यवाही झाली नाही तर निवडून आचारसंहिता संपताच अन्नत्याग आंदोलन करु असे आव्हान उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: सरपंच व सचिवाच्या संगणमताने पिपरिया ग्रामपंचायत मधे लाखो रुपयांचा गैरव्यवहार, ID: 29809

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर