भंडाराः- भंडारा – गोंदिया लोकसभेची निवडणुक १९ एप्रिल २०२४ ला होत असुन कोणत्या पक्षाची भुमिका काय असणार आहे.कोणता पक्ष जनतेसाठी काय देणार आहे यांचे जाहीरनामा आता पर्यंत क्लियर झालेला नाही. लोकसभेची तयारी लोकस्वराज्य पार्टीने का केली? याबाबद पार्टीचे चे उमेदवार विलास लेंडे यांनी सांगितले की आजपर्यंत ओबीसी समाजाला कॉग्रेस ने ६० वर्ष काहीच दिले नाही.कालेलकर आयोग तयार झाला त्यांच्या मध्ये पंडीत जवाहरलाल नेहरु याने चालढकल करुन तो तिथेच थांबला त्यानंतर बिजेपी ने शुध्दा ओबीसी ची जनगन्ना केलेली नाही.भारत देशात वाघाची,कुत्र्याची,गाई-बैलाची जनगन्ना होते.पण ओबीसी मधील जातीची जनगन्ना होत नाही. भारत देशात सांविधानिक कलम ओबीसी साठी ३४० असुन ओबीसी लोकसंख्येनुुसार ५२ टक्के प्रत्येक क्षेत्रात वाटा पाहीजे एस.सी. लोकांना १५ टक्के,एस.टी ७.५ टक्के पाहीजे आहे.पण आज पर्यंत ७५ वर्षात तो मिळाला नाही.त्यांच्या वाटा मिळाला पाहीजे व लोकांचे राज्य यावे यासाठी आम्ही लोकस्वराज्य पार्टी्च्या माध्यमातुन निवडणुक लढवित आहोत.
