साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे) लोकसभा निवडणूक व सन उत्सवाच्या अनुषंगाने गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने 1 एप्रिल 2024 रोज सोमवारला पोलीस स्टेशन सालेकसाचे सभागृहात आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सालेकसा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार गिरेपुंजे, सालेकसा पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण बुराडे, जि.प. सदस्यां सौ. विमल कटरे, सौ. नागपुरे, प्रा. गणेश भदाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांनी आपल्या मार्गदर्शनात एप्रिल महिन्यात 19 तारखेला होणारी लोकसभा निवडणूक, चेत्र नवरात्री, ईद उल फितर, डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, महावीर जयंती इत्यादी येणारे सनउत्सव व निवडणूक प्रक्रिया शांततेत संपन्न व्हावे वादविवाद होऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी, व प्रशासनाला सहकार्य करावे संदर्भात सविस्तर माहिती देत याच पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. तर सालेकसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण बुराडे यांनी गावागावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने सजग व कार्यरत राहावे शांतता अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन नागरिकांच्या सोबतीला आहे असे आव्हान केले. या प्रसंगी सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थिताचे आभार सालेकसा पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण बुराडे यांनी मानले.