????तज्ञ डाक्टराकडून 460 रुग्णाची तपासणी व औषधपचार
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे) जगाला क्षमा आणि प्रेमाचा संदेश देणारे प्रभू येशूच्या बलिदान दिनानिमित्त सत्य ही जीवन सत्संग भवन व मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी तालुका सालेकसाच्या संयुक्त विधमाने यांच्या वतीने जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सुप्रीम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल गोंदियातर्फे सालेकसा येथिल बहेकार काम्प्लेंक्स मधे 29 मार्च रोजी निशुल्क रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान डॉ.पुष्पराज गिरी, डॉ.वज्र पुष्पराज गिरी, डॉ.चंद्रशेखर राणा, डॉ.किसन ठकराणी, डॉ.विवेक हरिणखेडे, डॉ.रणजित खरोळे, डॉ.अनिल परियाल, डॉ.श्रीकांत राणा, डॉ. नेहा अग्रवाल, डॉ.आनंद कात्रे, डॉ.रितेश कात्रे, डॉ.कुणाल बोपचे, डॉ.दीपक हरिणखेडे, डॉ.कार्तिक हिंदुजा, डॉ.आस्था ठाकूर या तज्ञ डाक्टराकडून परिसरातील 460 रुग्णानी नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिव्यंग, नाक, कान, घसा रक्तदाब, आदी आजारांने ग्रस्त रुग्णाची तपासणी औषधपचार व पुढील उपचारासाठी मोफत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सालेकसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण बुराडे, सामाजिक कार्यकर्ते सुनील असाटी, ब्रजभूषण बैस, प्रा. गणेश भदाडे, विजय फुंडे, शैलेश बहेकार, विक्की भाटिया, नीलेश बोहरे, राकेश रोकडे, पास्टर राजेंद्र भस्मोटे, पत्रकार मायकल मेश्राम, पत्रकार यशवंत शेंडे, निर्दोष साखरे, संदीप अग्रवाल, उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथीचे डॉक्टर्स, सत्य ही जीवन सत्संग भवनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
