????सालेकसा तालुका प्रशासनाचे उपक्रम
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत सुरू केलेल्या मतदार जनजागृती अभियानामधील स्वीप अंतर्गत
सालेकसा तालुक्याचे निवडणूक अधिकारी व तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले, यांच्या मार्गदर्शनाखाली सालेकसा शहरातील बहेकार काम्प्लेंक्स परिसरात 1 मार्च रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्पस अंबेसिडर प्रा. गणेश भदाडे, प्रा. राकेश रोकडे यांच्या पुढाकाराने सालेकसा येथील सालेकसा कनिष्ठ महाविद्यालय, मनोहरभाई पटेल महाविद्यालय, आयटीआय, पेरामेडिकल कालेज व विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी रांगोळी साकारून मतदारांना मतदान करण्याचा संदेश दिला. राष्ट्रीय स्तरावरील नवीन विक्रम नोंदविण्यात सालेकसा येथील विध्यार्थ्यानी मोलाची भर घातली. सदर उपक्रमातून मतदारांना चांगला संदेश जाईल, यातून निश्चितच मतदान टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन 2024 साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवात सहभागी होवून मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करावे असे आव्हान पुरस्कार वितरण कार्यक्रमात तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे यांनी व्यक्त केले पुरस्कार वितरण कार्यक्रमात नायब तहसीलदार टी. आर. गिरेपुंजे, गटशिक्षणाधिकारी विशाल डोंगरे, गटसमन्व्यक पी. एस. शरणागत, बी. डी. चौधरी, तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, सचिन बहेकार, निलेश बोहरे, जी. जी. चौधरी, सुनीता मच्छीरके, बाबुसिंग राठोड, आर. यु. तूरकर, एस. एम. मंडले, श्वेता हतागंडे, एन. यु. कुरसुंगे, रांगोळी स्पर्धेचे परीक्षक स्वाती भोयर, नुसरत शेख, उपस्थित होते. स्पर्धेचा प्रथम पुरस्कार कु. स्वाती हटवार, दृतीय संजना परतेती, व रंजना डोंगरे, तृतीय भूपेश सयाम, दीपक कटरे, व चतुर्थ पुरस्कार पेरामेडिकल कालेजच्या विध्यार्थ्यांनी प्राप्त केले. यशस्वी विध्यार्थ्यांना रोख पुरस्कार व प्रमाण देऊन सत्कार करण्यात आले. रांगोळी स्पर्धा स्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, व ठाणेदार भूषण बुराडे यांनी सुद्धा भेट दिले होते. लोकशाहीतील सर्वात मोठा सण असलेल्या निवडणूकीमधे नागरिकांनी आपला हक्क बजावला पाहिजे असे मत उपस्थित अतिथीनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन राकेश रोकडे यांनी तर उपस्थिताचे आभार गणेश भदाडे यांनी मानले.
