???? 7 एप्रिल रोजी सहा जोडपे विवाह बंधनात अटकणार
????विवाहबद्ध होणाऱ्या वर-वधूनां शासनाच्या शुभमंगल योजनेचा लाभ मिळणार
साखरीटोला/गोंदिया-: (रमेश चुटे)
सालेकसा तालुक्यातील साकरीटोला/सातगाव येथील युवा कुणबी समाज सेवा समितीच्यावतीने आयोजीत कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा आज 7 एप्रिल रविवार रोजी सकाळी 11.05 वाजता नियोजित वेळी जि.प. हायस्कूलच्या पटागंणावर संपन्न होत आहे. कोरोना काळाचे दोन वर्ष सोडले तर मागील 21 वर्षांपासून दरवर्षी कुणबी समाज सेवा समिती सामूहिक विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन करीत असून क्षेत्रात एका नव्या परंपरेला सुरूवात केली आहे. या वर्षी सहा जोडप्याचे शुभमंगल होणार आहे. सामूहिक विवाह सोहळ्यांचे माध्यमातून गौरवशाली परंपरेची सुरूवात साकरीटोला येथूनच झाली आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात वर-वधूना सामाजीक बंधनात बांधण्याचे काम करीत असतानाच समाजाला सुद्धा एका मंचावर आणण्याचे काम या माध्यमाने होत आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात वर-वधूना आशीर्वाद देण्यासाठी माजी खासदार खासदार प्रफुलभाई पटेल, खा. सुनील मेंढे, खा. अशोक नेते, आमदार व कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डाँ. परिणय फुके, आ. सहेशराम कोरोटे, माजी आमदार संजय पुराम, राजेंद्र जैन, गोपालदास अग्रवाल, रमेशभाऊ कुथे, भेरसिंगभाऊ नागपुरे, केशव मानकर, माजी जिप अध्यक्ष विजयभाऊ शिवणकर, नरेश माहेश्वरी, जिल्हा परिषद सभापती सविताताई पुराम, कांग्रेसचे प्रदेश सचिव नामदेव किरसान, जिप सभापती रुपेश कुथे, जिप सदस्य उषाताई मेंढे, वंदनाताई काळे, लायकराम भेंडारकर, माजी सभापती लताताई दोनोंडे, कुणबी समाज नागपूरचे अध्यक्ष राजेश चुटे, उपसभापती संतोष बोहरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनील तरोने, कुणबी समाज खमारीचे अध्यक्ष बुधराम चुटे, पस सदस्य रेखाताई फुंडे, गणेश ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक विजय बहेकार, कुणबी समाज सडक/अर्जुनीचे अरुण डोये, सातगावचे सरपंच नरेश कावरे, भजेपारचे सरपंच चंद्रकुमार बहेकार, कुणबी समाज देवरीचे रामजी गायधने, सुनंदाताई बहेकार, कुणबी समाज सालेकसाचे गौरीशंकर भांडारकर, कुणबी समाज आमगावचे नितेश दोनोंडे, प्रमोद येटरे, नटवरलाल गांधी, संपत सोनी, लीलाधरभाऊ पाथोडे, काशीराम शिवणकर, सालेकसाचे ठाणेदार भूषण बुराडे, कुणबी समाज नागपूरचे मोरेश्वर फुंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तुषार पौनीकर, कुणबी समाज सेवा समितीचे संस्थापक पदाधिकारी प्रभाकर दोनोंडे, भूमेश्वर मेंढे, कमलबापू बहेकार, रमेश चुटे, युगराम कोरे, संजय देशमुख, यांच्या उपस्थित विवाह सोहळा संपन्न होणार आहे. विवाह सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष देवराम चुटे, अरविंद फुंडे, रामदास हत्तीमारे, पृथ्वीराज शिवणकर, प्रमोद कोरे, पुरूषोत्तम कोरे, योगेश बहेकार, प्रेम कोरे, प्रकाश दोनोडे, संजय बागडे सह समितीचे पदाधिकारी व समाजबांधव परिश्रम घेत आहेत.