????साखरीटोला येथील कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा थाटामाटात
???? सहा जोडपे विवाहबद्ध, परंपरेनुसार सकाळी 11.05 वाजता नियोजित वेळी लग्न, जेवण व पिण्याच्या पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
सामूहिक विवाह सोहळ्यातून फिजूल खर्चापासून सुटका होते. शिवाय स्वस्थ व मजबूत समाजाचा पाया तयार होतो. सामूहिक विवाह सोहळ्यातून समाजात सामाजिकतेच्या भावनेला वाढ मिळत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार संजय पुराम यांनी केले. सालेकसा तालुक्यातील ग्राम साकरीटोला येथे युवा कुणबी समाज सेवा समितीच्यावतीने 7 एप्रिल रविवार रोजी आयोजीत सामूहिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. पुढे बोलताना पुराम यांनी, साखरीटोला येथील समिती मागील 21 वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन करीत असून क्षेत्रात एका नव्या परंपरेला सुरूवात केली आहे. आज कित्येक संघटनांकडून सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जात आहे. मात्र ढोल तासाच्या गजरात वाजत-गाजत वर पक्षाची वरात वरात आणून नियोजित वेळी सकाळी 11.05 वाजता लग्न लावणे, जेवण व पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करणे, मंडप पूजन व हळदीचा भरगच्च कार्यक्रम या गौरवशाली परंपरेची सुरूवात साकरीटोला येथूनच झाली आहे. सामूहिक विवाह सोहळ्याचे माध्यमाने युगलांना सामाजीक बंधनात बांधण्याचे काम करीत असतानाच समाजही एकत्रीत होवून एका मंचावर येत असल्याचे मत व्यक्त केले. सामूहिक विवाह सोहळ्यात वर-वधूना आशीर्वाद देण्यासाठी माजी खासदार अशोक नेते, खासदार सुनील मेंढे यांच्या अर्धांगिनी सौ. शुभांगी मेंढे, आमदार सहेशराम कोरोटे, माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार केशवभाऊ मानकर, माजी जिप अध्यक्ष विजयभाऊ शिवणकर, भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र फुंडे, जि.प. सभापती सविताताई पुराम, जिप सदस्य उषाताई मेंढे, वंदनाताई काळे, लक्ष्मीताई तरोने, सौ. विमल कटरे, जिप सदस्य किशोर महारवाडे, माजी सभापती लताताई दोनोंडे, उपसभापती संतोष बोहरे, प.स. सदस्य रेखाताई फुंडे, सातगावचे सरपंच नरेश कावरे, भजेपारचे सरपंच चंद्रकुमार बहेकार, सुनंदाताई बहेकार, कुणबी समाज सालेकसाचे गौरीशंकर भांडारकर, लीलाधरभाऊ पाथोडे, काशीराम शिवणकर, ठाणेदार भूषण बुराडे, कुणबी समाज नागपूरचे मोरेश्वर फुंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तुषार पौनीकर, काशीराम हुकरे, राजकुमार पुराम, देवरी भाजपचे अध्यक्ष येरणे, डाँ. श्रीकांत राणा, फुंडे पकोळेवाले नागपूर, कुणबी समाज सेवा समितीचे संस्थापक पदाधिकारी प्रभाकर दोनोंडे, भूमेश्वर मेंढे, कमलबापू बहेकार, रमेश चुटे, युगराम कोरे, संजय देशमुख, सौ. इंदूताई कोरे, मिताली काळे, किरण कोरे, प्रतिभा मेंढे, स्वाती फुंडे, टीना चुटे, सविता येटरे, दीपलता हत्तीमारे, मंजुषा दोनोंडे, वैशाली मेंढे, अरुणा मेंढे, निकिता कावरे, अध्यक्ष देवराम चुटे, अरविंद फुंडे, रामदास हत्तीमारे, पृथ्वीराज शिवणकर, पुरूषोत्तम कोरे, प्रमोद कोरे, योगेश बहेकार, कैलास बहेकार, खुशाल शिवणकर, शामलाल दोनोंडे, संजय दोनोंडे राजू काळे, देवराज खोटेले, यांनी उपस्थित राहून वर-वधूना आशीर्वाद दिले. विवाह सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी समितीचे पदाधिकारी समाजबांधवानी परिश्रम घेतले.
