Published:

रस्त्याचे छमतेनुसार वाहनाचे उपयोग करा- सरपंच टेभंरे

????जड वाहनांमुळे रस्त्यांवर जागोजागी खड्डे
????तालुक्यातील अनेक रस्त्याचे वाजले बारा
????सरपंचाचे सालेकसा तहसीलदाराला निवेदन
साखरीटोला/ सालेकसा-: (रमेश चुटे)
सालेकसा तालुक्यातील अनेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्या रस्त्यांचे बारा वाजले आहेत. मध्यप्रदेश व छ्तीसगड राज्याला जोडणाऱ्या आदिवासी बहुल सालेकसा तालुक्यातील रस्त्यांकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. जें रस्ते चांगले व गूळगुळीत आहेत त्या रस्त्यावर क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे मोठ मोठया टिप्परने सतत वाहतूक होत असल्यामुळे त्या रस्त्यांवर सुद्धा मोठमोठे खड्डे पडले आहेत. तरी रस्त्याच्या छमतेपेक्षा अधिक वजनी टिप्पर सदर रस्त्यावरून बंद करण्यात यावे असे निवेदन ग्रामपंचायत दरबडाचे सरपंच तमीलकुमार टेभंरे यांनी सालेकसाचे तहसीलदाराला दिले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत दरबडा हद्दीतील रेल्वे क्रॉसिंग वर रेल्वे विभागाच्या वतीने आरओबी चे काम सुरु असून सदर काम जीएसटी कार्पोरेशन पीव्हीटी एलटीडी ही कंपनी करीत आहे. मात्र सदर कंपनी कमी छमतेच्या रस्त्यावर 40 ते 50 टन वजन क्षमतेचे वाहनांचे उपयोग करून मटेरियल सप्लाई करीत आहे. ज्या मार्गावरून सदर कंपनीचे 40 ते 50 टन वजनी टिप्पर मटेरियल घेऊन आवागमन करीत आहेत सदर मार्ग प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेद्वारे तयार झाले असून त्या रस्त्याची वाहतूक क्षमता फक्त नऊ ते दहा टन ऐवढीच आहे. दरम्यान रस्त्याच्या क्षमतेपेक्षा कित्येक पटीने जास्त वजनी वाहन रस्त्यावरून सतत जात असल्याने रस्त्याला जागोजागी खोल खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावरून सतत प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करून प्रवास करावे लागत आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे भविष्यात जीवत हानी होण्याची शक्यता नकारता येत नाही. सतत खड्डे पडत असून सुद्धा बांधकाम कंपनी दुर्लक्ष करीत आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे ग्रामपंचायत दरबाडा येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. नुकत्याच अवकाळी पावसामुळे रस्त्यावरील खड्यात पाणी साचले असल्याने नागरिकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे. सदर प्रकरण लक्षात घेऊन ग्रामपंचायत कार्यालय दरबडाच्या वतीने 8 एप्रिल 2024 पासून या मार्गावरील जड वाहनाची वाहतूक बंद करण्यात असे पत्र सालेकसाचे तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांना दिले.
सरपंच टेभंरे यांची- प्रतिक्रिया
यामार्गावर चालत असलेल्या जड वाहना संदर्भात माहिती काढली असता मागील एक वर्ष पासून धानोली व दरबड़ा येथील रेल्वे आरओबीचे काम जेंएसके कंपनी करित आहे अशी माहिती कंपनीचे प्रतिनिधि मिश्रा यांनी मौखिक दिले. अधिक वजनी जड़ वाहन बंद करून रस्त्याचे क्षमतेनुसार वाहनाचे उपयोग करावे असी सूचना ग्रा. प. च्यावतीने त्यांना देण्यात आले होते. पण कंपनी या कडे दुर्लक्ष करीत असून मागिल तिन-चार महिन्यात या रस्त्यावर 6 ते 7 अपघात झाले आहेत. सदर घटनेमुळे गावातील नागरिकांच्या निर्णयानुसार जड़ वाहनांच्या वाहतुकी वर बंदी घालण्यात आली आहे.
तमिलकुमार टेंभरे
सरपंच ग्रामपंचायत दरबडा
प.स. सालेकसा जि.प. गोंदिया

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: रस्त्याचे छमतेनुसार वाहनाचे उपयोग करा- सरपंच टेभंरे, ID: 29893

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर