आमगांवः- ओबीसी समाजाची एवढी मोठी संख्या असतांनी कोणतीही सरकार जनगन्ना का करित नाही याबाबद ते म्हणतात की ओबीसी समाजाचे प्रत्येक पार्टी मध्ये कार्यकर्ता आहेत पण कॉग्रेस ने देशात ६० वर्ष सत्ता भोगली तरी ओबीसीची जनगन्ना केली नाही.मग आमचे कार्यकर्ता त्यांच्या मंचावर जावुन किंवा टिकट घेवुन कुणाचा काम करतात या बदल सभ्रम ओबीसीच्या जागृत मतदारामध्ये आहे.त्यानंतर बीजेपी ने ओबीसीच्या लोकांना सांगितले की आमची सत्ता आली तर आम्ही जनगन्ना करु.पण त्यांनी शुध्दा ओबीसी ची जनगन्ना केली नाही तर ओबीसी लोकांना सांविधानिक अधिकार भारतात कसे मिळतील यांचा विचार ओबीसी मतदार यांनी केले पाहीजे. ओबीसी समाजाने आपले सांविधानिक अधिकार घेण्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे.ओबीसी समाजाचे जे कर्मचारी व पदाधिकारी झाले ते संविधानामुळे झाले त्यांनी सांविधानिक अधिकार जपुन समाजाला त्यांच्या अधिकारा बाबत जागृत करण्याचे काम केले पाहीजे. जर ओबीसी समाज इकडे-तिकडे किंवा कोणत्याच पक्षाचा पदाधिकारी नसतांना ओबीसी समाज स्वतःचा पक्ष तयार करुन भारत देशाचा शासन कर्ता समाज बनु शकतो.
बि.एम.करमकर ओबीसी सेवा संघ (जिल्हाध्यक्ष)