????जगतगुरू नरेंद्राचार्यजी महाराज सांप्रदायचे उपक्रम
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम संप्रदाय गोंदिया ता. सालेकसाच्या वतीने सालेकसा येथे हिंदू नववर्ष व गुढीपाडवा निमित्त भव्य शोभायात्रा काढून दिमाखदार पद्धतीने नवंवर्ष साजरा करण्यात आला.
एपीजे अब्दुल कलाम पब्लिक स्कूल सालेकसा येथे नववर्षाच्या स्वागताकरिता गुढी उभारून संपूर्ण सालेकसा शहरात भ्रमण करण्यात आले. त्यात युवक युवतींनी बाईक रॅली, गुडीधारी महिला, कलशधारी महिला, झेंडेधारी महिला पुरुष, संत गाडगेबाबा, संत तुकाराम महाराज, राम दरबार, झाशीची राणी लक्ष्मीबाई, बिरसा मुंडा, शिवाजी महाराज, यांचा देखावा तयार करून लेझीम व ढोल ताशाच्या गजरात आदिवासी पारंपारिक नृत्यासोबत शोभायात्रा निघाल्याने संपूर्ण सालेकसा शहर भक्तीमय झाले होते. गुरूंच्या शिकवणीप्रमाणे सर्व हिंदू धर्मीय बांधवांनी नववर्षाचे जल्लोषात पण शिस्तबद्ध पद्धतीने स्वागत केले. शोभायात्रेत जिल्ह्यातील जवळपास तीन हजार महिला पुरुषांची उपस्थिती होती.
शोभयात्रा मिरवणुकीचे जागोजागी स्वागतमहाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करणारी मिरवणूक काढली असल्याने सालेकसा शहरातील घरीघरी व रस्त्यांवर सुंदर रांगोळी, फुले, होती तर घराचे व्दार आंब्याच्या पानांनी सजवली असून जागोजागी स्वागत करण्यात आले. शहराचे भ्रमण झाल्यानंतर उपस्थितांनी महाप्रसादीचा आनंद घेतला. कार्यक्रमाला यशस्वी करण्यातसाठी नवरंग मेश्राम जिल्हा निरीक्षक गोंदिया, मूलचंद खांडवाये जिल्हाध्यक्ष गोंदिया, प्रकाश भोंडे पीठ सदस्य नागपूर, जयपाल खंडवाये जिल्हा सचिव, योगराज डोंगरवार जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, निखिल शहारे जिल्हा युवा प्रमुख, सौ. वैशाली चतुर जिल्हा महिला प्रमुख, सौ. हेमलता गिरीपुंजे माजी जिल्हाध्यक्ष, वाघाळे साहेब तालुका प्रमुख सालेकसा, तालुका सचिव फुंडे, प्रकाश कोरे, राजेंद्र भांडारकर, शिवाजी बोहरे, गायकवाड तालुकाध्यक्ष अर्जुनी मोरगाव, श्रीमती आचलेताई तालुकाध्यक्ष देवरी, ठाकूर तालुका अध्यक्ष गोंदिया, नाईक तालुका अध्यक्ष गोरेगाव, भलावी तालुका अध्यक्ष तिरोडा, तसेच संत संघ कमिटी सालेकसा यांनी परिश्रम घेतले.
सालेकसा मित्र परिवार तर्फे बिस्कुट आणि पाणीचे वितरण
सालेकसा येथे काढलेल्या गुढी यात्रेनिमित्त उपस्थित भक्तगणांना सालेकसा येथील बहेकार कॉम्प्लेक्स जवळ बिस्कुट व गांधी चौक येथे पाण्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये सचिन बहेकार, विनय शर्मा, विलास फुंडे, ब्रजभूषण बैस,गणेश भदाडे, विजय मानकर, मधू हरीणखेडे, राकेश रोकडे, सुनील असाटी, नितेश शिवणकर, टिंकु अग्रवाल, सुभाष हेमने, हरीश बहेकार, प्रमोद चुटे, निलेश बोहरे, योगेश बहेकार, छोटू धूर्वे, प्रवीण बोहरे, सुभास वाघाळे, मनोज बहेकार, संजय मौजे, गगन भंडारकर, रवी चुटे, महेश खोकले यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज सांप्रदाय तर्फे हिंदू नववर्षानिमित्त देखावा व शुभयात्रेचे स्वागत केले.
![Elgar Live News](https://secure.gravatar.com/avatar/74fb4f4b083185b668967fec198f3e1b?s=96&r=g&d=https://elgarlivenews.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)