नगर परिषद प्रशासनाने या देवतलावाची दखल वेळेवर न घेतल्यास हा ३.५ ऐकराचा तलाव नामशेष झाल्या शिवाय राहणार नाही. निवेदनाच्या माध्यमातून मनसे तालुका अध्यक्ष सुरेश वि. ठाकरे यांनी मुख्याधिकारी बल्लाड साहेब यांना मागणी केली. गोदिया शहर- गोंदिया नगर परिषद क्षेत्रातील छोटा गोंदिया खुर्द गोविंदपूर येथील देवतलावांतील पाणी दुषीत झाल्यामुळे तेथील पाणी जनावर सुद्धा पाणी पीत नाही व त्या तलावाच्या आजूबाजूच्या रहिवासियांच्या घरातील बोरवेल व विहिरीतील पाणी दूषित दुर्गंध युक्त येत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या त्याच्या समोर उद्भवली आहे. करिता अशा पिण्याच्या व तलावाचा जल्वंत प्रश्न प्रशासनाकडे जिल्हा प्रशासनाने व नगर परिषद प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.गोंदिया जिल्हा हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु गोंदिया शहरात काही ठिकाणी चार ते पाच मोठी तलाव आहे त्या मधून देवतलाव व डोगंर तलाव हे आहेत या दोन तलावातील पाण्याचा वापर जनावरांना पीण्याकरीता व अन्य उपयोगा करिता व विहीर व घरातील बोरवेलच्या पाण्याची पातळी वाढविण्यास मदत होण्याकरिता हे तलाव अतिशय महत्वाचे होते.
परंतु वाढत्या शहरी करणामुळे व नगर परिषदेच्या नियोजन अभावी,
या तलावात घरातील खराब सांडपाणी कॉंक्रिट नाली द्वारे या तलावात सोडाला जातो. सीमेंटच्या पिशव्या धुतल्या जातात, घरातील केरकचरा टाकल्यामुळे या देवतलावातील पाणी दुषीत झाला आहे.लोकवस्तीच्या मध्यभागी असलेला देवतलावात अनेक वर्षा पासून घरातील सांडपाणी (दूषित पाणी ) जात असल्यामुळे या तलावातील संपूर्ण पाणी दुषीत असल्यामुळे या भागातील रहिवाशियांना व शाळेतील चिमुकल्या विद्यार्थी, येण्याऱ्या जाणाऱ्या राहगीरांना दुर्गंधीचा सामना करत मार्गक्रमण करावा लागतो.
या विषया संदर्भात नगर परिषद प्रशासनाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे यांनी 2016 पासून निवेदनाच्या माध्यमातुन देवतलावातील गाळ काडून तलावाच सौंदरीकरण करणे या साठी नगर परिषद प्रशासनाने डिटेक्स प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठविण्यात यावे अशी मागणी अनेकदा न,प. प्रशासनाला करण्यात आली असता तारीपण कित्येक वर्ष लोटून सुद्धा आश्वासनाची पूर्तता होऊ शकली नाही, हि किती शोकांतिका आहे,
प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात देवतलावात साचलेल्या दूषित पाण्यामुळे दुर्गन्ध येत असतो या परिसरातील नागरिकांमध्ये नगर परिषद प्रशासना- प्रति तीव्र संताप व्यक्त केला जात आहे,
तरी नगर परिषद प्रशासन अशा जल्वंत विषया कडे दुर्लक्ष करीत आहे.
देवतलाव हा 3.5 एकर परिसरात व्याप्त आहे, तलावात या भागातील रहिवासियांच्या घरातील सोडण्यात येणारा सांडपाणी दुसऱ्या बाजूला वळविण्यात यावा व या तलावातील गाळ काढून सौंदरीकरण करून अशा नैसर्गिक तलावाला जीवनदान दिल्यास भविष्यात या परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई किंवा पाण्या करीता पायपीट करावा लागणार नाही,
आपण घर कुठेही बांधू शकतो परंतु पाणी तुम्हाला कुठेही उपलब्ध होऊ शकत नाही, याची जाणीव इथल्या जनतेला व प्रशासनाला असायला हवीअशा ज्वलंत विषयावर नगर परिषद प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यायला हवा, एकीकढे भारताचे पंतप्रधान मा. मोदी साहेब सांगतात कि भविष्यात आपल्या भारतात पाण्याचा पाण्याचा दुष्काळ होऊ नये म्हणून त्यांनी संपूर्ण भारतात कृत्रिम तळे तयार करण्याचे आदेश दिले आहे या मुळे आपल्या जनतेला पाण्या करिता पायपीट करण्याची वेळ येवु नये असे त्याचे म्हणणे आहे.
परतु आपण आपला स्वार्थ साध्य करण्या करिता भविष्याची परवा न करता. नैसर्गिक तलावाना बुजविण्याचा (नामशेष) करण्याचा प्रयत्न करीत आहेत हे किती मानवीय शाहनपणाचे उदाहरण आहे हे दिसून येते.म्हणून घराचा विचार नंतर करा प्रथम पिण्याचा पाण्याचा विचार करा.
जल है तो कल है,
पाण्या शिवाय जीवन नाही,
पाणी अडवा पानी जिरवा,
हे बोध वाक्य बोलतात तर सर्वच पण कृतीत कोणीच आणीत नाही,
तुमच्या करिता नाही पण तुमच्या येणाऱ्या भावी पीढिकरिता तरी पिण्याचा पाण्याचा विचार करा हे देवतलाव वाचविण्याकरिता तुम्हा सर्व गोविंदपूर व छोटा गोंदिया वासियांना हात जोडून विनंती..!
