????सुट्टीच्या दिवसी सीईओ मुरूगानंथम यांची सातगाव प्राथमिक आराेग्य केंद्राला आकस्मिक भेट
????आरोग्य सेविका वीणा बिसेन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांचा ब्लड प्रेसर तपासला
साखरीटोला-: (रमेश चुटे) गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी रविवार (दि. 14) एप्रिल रोजी सालेकसा तालुक्यातील सातगाव/साखरीटोला येथील प्राथमिक आराेग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली. सुट्टीच्या दिवसी आरोग्य केंद्रातील डाक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित राहतात की नाही व आरोग्य व्यवस्थेची माहिती जाणून घेण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी 14 एप्रिल डाँ. आंबेडकर जयंती व रविवारला थेट सुट्टीच्या दिवसी सातगाव/साखरीटोला येथील प्राथमिक आराेग्य केंद्राला दुपारी 2 वाजताचे सुमारास आकस्मिक भेट देऊन आराेग्य केंद्रात सुरू असलेल्या आरोग्य सेवा, व सुविधा व्यवस्थेची पाहणी केले. पाहणी दरम्यान आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली असल्याचे दिसून आले. तरी सुद्धा आरोग्य व्यवस्था व ओपिडी नुसार रुग्णाचे होत असलेले उपचार यावर समाधान व्यक्त केले. आरोग्य विभागाच्या नवीन इमारतीचे बांधकाम लवकरच सुरु होत असून नवीन इमारत तयार होई पर्यंत लागूनच असलेल्या दुसऱ्या चांगल्या कमऱ्यात आरोग्य सेवा सुरु ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे नियमित गाव निहाय भेटीचे नियोजन, पर्यवेक्षकाच्या उपकेंद्राना भेटी, औषधी साठा, व राष्टीय आरोग्य कार्यक्रमाचा आढावा घेतला. मुख्यालयात राहणे, रुग्ण सुविधा गुणवत्तापूर्वक देणे, राष्टीय कार्यक्रमाची तंतोतंत अंमलबाजणी करणे, कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोडचे पालन करणे बाबद सूचना देण्यात आले. ओपिडी रजिस्टरची तपासणी करून स्वाक्षरी केले. आकस्मिक भेटी दरम्यान वैधकीय अधिकारी डाँ. किरण बाहेती/सोमाणी, डाँ. पल्लवी रामटेके, प्रयोगशाळा तज्ञ् प्रदीप गिल्ले, आरोग्य सेविका वीणा बिसेन, परिचर लटये, व कनिष्ठ सहाय्यक उपस्थित होते. आरोग्य सेविका वीणा बिसेन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांचा ब्लड प्रेसर चेक केला. दरम्यान डाक्टर व कर्मचाऱ्यांशी सीईओ मुरूगानंथम यांनी संवाद साधला.