संपुर्ण समाजातील संघटनेने एस.डी.ओ.पोलिस विभागाला आरोपीला तात्काळ अटक करुन कार्यवाही करा अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
देवरीः- देवरी तालूक्यातील ग्रामपंचायत महेताखेडा अंतर्गत गोठानपार येथे दिनांक.२० एप्रिल- २०२४ रोज शनिवारला अल्यवयीन मुलीचे अपहरण नंतर विनयभंग करुन तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. ही बाब मानवी मन हादरवणारी असून देवरी तालुक्यातील विविध समाजातील व ज्यांना माणुसकीची जाणिव असणारे जागृत तरुण-तरुणी यांनी सुध्दा निवेदन दिले आहे. सदर घटनेतील पिडीत मुलीचा विनयभंग करुन तिची हत्या करण्यात आली सदर घटनेला तिनदिवस लोटुन देखील आरोपींचा शोध लागलेला नाही, त्या बाबत आदिवासी समाजामध्ये तिव्र असंतोष निर्माण होत आहे. सदर आरोपी ना तात्काळ अटक करुन सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पिडीत कुटूबांला न्याय मिळवून देण्यात यावा.अन्यथा देवरी तालुक्यातील विविध समाजातील व ज्यांना माणुसकीची जाणिव असणारे जागृत तरुण-तरुणीच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेता आरोपी ना तात्काळ अटक करावी तसेच अशा अमानविय कृत्यांची पुनरावृत्ती होऊ नये करिता त्या आरोपी ना कठोर शिक्षा व्हावी करीता निवेदन देण्यात आले आहे.