????चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात चूरसीचा सामना” महायुतीचे मुनगूटीवांर यांना निसटता विजय मिळण्याची शक्यता?
मुंबई-: (महाराष्ट्र ब्युरो RBC)
लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्याची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. किरकोळ अपवाद वगळता अनुचित घटना घडल्याचे नोंद नाही. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता अधिक असल्याने शहरासह ग्रामीण भागातही सकाळीच मतदानासाठी गर्दी उसळलेली होती. 19 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्याचे मतदान संपन्न झाले. यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा/गोंदिया, गडचिरोली/चिमूर, आणि चंद्रपूर मतदारसंघाचा समावेश असून रामटेक मधून शिवसेना (शिंदे गटचे) राजू पारवे, विरुद्ध कांग्रेसचे शामकुमार बर्वे, नागपूर मधून भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध कांग्रेसचे विकास ठाकरे, चंद्रपूर मधून भाजपचे सुधीर मूनगूंटीवार विरुद्ध कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, भंडारा/गोंदिया, मधून भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध कांग्रेसचे डाँ. प्रशांत पडोळे, गडचिरोली/चिमूर लोकसभा क्षेत्रातून भाजपचे अशोक नेते विरुद्ध कांग्रेसचे डाँ नामदेव किरसान यांच्यात सरळ लढत आहे. तापमानामुळे मतदानाची टक्केवारी घसरली असून अनेक जागी उशिरा पर्यंत मतदान सुरु असल्याने मतदानाची नेमकी टक्केवारी वेळेवर उपलब्ध झाली नव्हती. नागपूर लोकसभा क्षेत्रात 54.11 टक्के, चंद्रपूर 67.57 टक्के, रामटेक 51.38 टक्के, भंडारा/गोंदिया 67. 04 टक्के, गडचिरोली/चिमूर क्षेत्रात 71.88 टक्के मतदान झाले. या पाचही लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमधे थेट लढत आहे. यातच वंचित बहुजन आघाडी, बसपा, अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र कुठेच त्रिकोणी किंवा चौरंगी लढत झाल्याचे दिसून आले नाही. 19 एप्रिल रोजी या पाचही लोकसभा मतदारसंघातील मतदान ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाल्यानंतर मतदारांचा कौल जाणले असता महायुतीचे उमेदवाराचा वरचष्मा राहणार असल्याचे निर्देशनात आले. तर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचे सुधीर मूनगूंटीवार व कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात काटेरी लढत असून महायुतीचे मुनंगुटीवारांना निसटता विजय मिळु शकतो असाही मतदाराचा अंदाज आहे. पोलच्या सर्वेत मोठे सैम्पल घेतले असून प्रत्येक लोकसभा मतदार संघ, क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यातील विविध गाव व शहरातून दोनसे मतदाराचा कौल घेण्यात आले. आकलनानुसार महाराष्टातील पाच पैकी, चार नागपूर, रामटेक, गडचिरोली-चिमूर, भंडारा-गोंदिया, या मतदारसंघात महायुतीचे उम्मेदवार क्रमशः नितीन गडकरी, राजू पारवे, अशोक नेते, सुनील मेंढे यांचे पारडे जड असल्याचे स्पष्ट कौल असून. चंद्रपूर मतदारसंघांत बरोबरीचा संघर्ष असल्याचा चित्र आहे यात कौन जिंकेल हे अस्पस्ट असले तरी महायुतीचे सुधीर मूनगटीवार निसटता विजय मिळवू शकतात असा मतदाराचा अंदाज आहे.2019 लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी 2,16,009/ मतांनी विजयी झाले होते. भाजपचे नितीन गडकरी यांना 6,60,221, मत मिळाली होती, तर कांग्रेसचे नानाभाऊ पटोले यांना 4,44212 मते मिळाली होती. बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला 31,725/ मते, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 26,138/ मते मिळाली होती.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून कांग्रेसचे उमेदवार बाळूभाऊ धानोरकर 44,763/ मतांनी विजयी झाले होते. कांग्रेसचे बाळूभाऊ धानोरकर यांना 5,59,507/ मत मिळाली होती, तर भाजपचे हंसराज अहिर यांना 5,14,744/ मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने 1,12,079/ मते घेतली होती तर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला 11,810/ मते मिळाली होती.
रामटेक लोकसभा मतदार संघातून शिवसेनाचे उमेदवार कृपाल तुमाने 1,26,783/ मतांनी विजयी झाले होते. शिवसेनाचे कृपाल तुमाने यांना 5,97,126/ मत मिळाली होती, तर कांग्रेसचे किशोर गजभिये यांना 4,70,343/ मते मिळाली होती. बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराने 44,327/ मते, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 36,340/ मते मिळाली होती.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार अशोक नेते 77,526/ मतांनी विजयी झाले होते. भाजपचे अशोक नेते यांना 5,19968/ मत मिळाली होती, तर कांग्रेसचे नामदेव उसेंडी यांना 4,42,442/मते मिळाली होती. वंचित बहुजन समाज आघाडीच्या उमेदवाराने 1,11,468/ मते, तर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला 28,104/ मते मिळाली होती.भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार सुनील मेंढे 1,97,394/ मतांनी विजयी झाले होते. भाजपचे सुनील मेंढे यांना 6,50,243, मते मिळाली होती, तर कांग्रेसचे नाना पंचबुद्धे यांना 4,42,442/मते मिळाली होती. बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला 52,659/ मते, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 45,842/ मते मिळाली होती. महायुती मधील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गटातील राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च नेत्यापासून ते तालुका अध्यक्ष पदावरील नेत्यांनी भाजप व शिवसेना उमेदवारासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले. मात्र राकापाचे सर्वसामान्य कार्यकर्ते व मतदाराचे मत भाजप उमेदवारासाठी परिवर्तीत करु शकले नाही हे उल्लेखनीय आहे. गडचिरोली/चिमूर लोकसभाचे भाजप उमेदवार अशोक नेते, आणि भंडारा/गोंदियाचे भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्या उम्मेदवारीबद्दल क्षेत्रातील काही भागात नाराजीचा सूर होता. तर अनेक ठिकाणी नेते आणि मेंढे यांच्या चांगल्या पनाच्या बळावर विरोधकांनी आपला पक्ष सोडून भाजप मधे प्रवेश केला व भाजपच्या विजयासाठी प्रयत्न केले हे सुद्धा विशेष उल्लेखनीय आहे. यावेळी बसपा आणि वंचित बहुजन आघाडी किती मते घेणार आणि कोणत्या पक्षाला सुरंग लावणार याकडे दोन्ही पक्षाचे लक्ष वेधले आहे.
