????बेटी बचाओ बेटी पढाओतर्फे सालेकसा पोलिस स्टेशन मार्फत पोलीस अधीक्षकांना निवेदन
साखरीटोला/सालेकसा-: विवाहस्थळी आलेल्या एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. ही घटना शनिवारी ता. 20 एप्रिलच्या सकाळी देवरी तालुक्याच्या गोठणपार लगतच्या जंगलात उघडकीस आली. नयना संतोष अर्करा वय 12 वर्ष रा. गोठणपार असे मृतक मुलीचे नाव आहे. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी गुन्हेगारांना फासावर चढवा असे निवेदन 24 एप्रिल रोजी सालेकसा पोलीस स्टेशनच्या मार्फत पोलीस अधीक्षक गोंदिया यांना देण्यात आले. निवेदन देते वेळी पंचायत समिती सदस्य, व बेटी बचाओ बेटी पढाओच्या गोंदिया जिल्हा संयोजिका सौ.अर्चनाताई मडावी, बेटी बचाओ बेटी पढाओच्या सालेकसा तालुका सहसंयोजिका सौ. दिपाली बारसे, सौ. संगीता पंधरे, कू. आराध्या पंधरे, कू. लावण्या बारसे, खुशी एकुलकर उपस्थित होते. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भसबोडन येथील नरेश तितराम यांचा मुलगा राकेश उर्फ रॉकी, व देवरी तालुक्यातील गोठणपार येथील कुरूसिंग पडोटी यांची मुलगी हेमलता उर्फ लता यांचा लग्नसोहळा 19 एप्रिल रोजी सायंकाळी गोठणपार येथे आयोजित होते. या लग्नात नयना अर्करा ही देखील आपल्या पालकांसह उपस्थित होती. याच वेळी अंधाराचा फायदा घेऊन आरोपींनी तिचे अपहरण केले. व गावाशेजारी असणाऱ्या जंगलात अत्याचार केला आणि चेहरा दगडाने ठेचून तिची हत्या केली. दरम्यान, लग्न कार्यात व्यस्त असलेल्या पालकांना जेव्हा मुलगी लग्नस्थळी आढळली नाही, तेव्हा तिच्या पालकांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, रात्री कुठेही तिचा शोधाशोध केला पण पत्ता लागला नाही. तथापि, 20 एप्रिल शनिवारला धवलखेडी गावातील गावकरी जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेले असता तिथे त्यांना मुलीचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी चिचगड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. देवरी पोलीस विभागातर्फे आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे देवरी तालुक्यासह गोंदिया जिल्हा हादरला असून, आरोपींना लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. मृतक मुलगी ही कडीकसा येथील शासकीय आश्रमशाळेची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी होती
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: लैंगिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या, गुन्हेगारांना अटक करून फासावर चढवा- अर्चना मडावी, ID: 29983
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: लैंगिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या, गुन्हेगारांना अटक करून फासावर चढवा- अर्चना मडावी, ID: 29983
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]