डवकी फाटा बस स्थानकावरील घटना.. देवरीः- (कन्हैया क्षीरसागर) दिनांकः-२९ ला देवरी तालुक्यातील डवकी गाव येथील बसस्थानकाजवळील मुख्य रस्त्यावरील 9.30 च्या दरम्यान घडलेल्या अपघातात बोलेरो क्र. सी.जी. ०८ ए.क्यू. ६०३८ ने मागून ऑटो क्र.एम एच ३६ के १६०५ ला जबर धडक दिल्यामुळे ऑटो पलटली.त्यात बसलेल्या भरत वाघाळे चालक विनोद मोहबे जखमी झाले आहेत.प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे हलविण्यात आले.
सविस्तर असे की, ऑटो क्र.एम एच ३५ के १६०५ देवरी वरून दरवाजाचे चौपट घेऊन फुक्कीमेटा मार्गाच्या दिशेने जात असताना, मागेहून भरधाव वेगाने येणारी बोलेरो ने ऑटो ला जबर धडक दिली. त्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने, ऑटो रस्त्याच्या कडेला उतरून डवकी बस स्थानकावर पलटी झाला.त्यात बसलेल्या एका प्रवाशासह चालक जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय देवरी येथे हलविण्यात आले असून, या घटनेची नोंद देवरी पोलिस घेत असुन पुढील तपास कार्य सुरू आहे.
