भाजपचे अशोक नेते यांचेच पारडे जड
गडचिरोली:-(RBC ब्युरो)
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील 10 उमेदवारांचे भाग्य 19 एप्रिल रोजी मशिनबंद झाले. 4 जूनला निकाल जाहीर होणार असला तरी, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात कुणाचे पारडे जड राहिल याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात. 66 आमगांव (एसटी), 67आरमोरी (एसटी), 68 गढ़चिरौली (एसटी), 69 अहेरी (एसटी), 73 ब्रम्हपुरी-चंद्रपुर, 74 चिमुर या सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. नक्षलप्रभावित लोकसभा क्षेत्र असला तरी मतदान टक्केवारीत हा लोकसभा क्षेत्र आघाडीवर असून मतदानाची टक्केवारी 71.88 टक्के आहे. विधानसभा क्षेत्र निहाय मतदाराचा कौल जाणून घेतले असता आरमोरी, गढ़चिरौली, अहेरी, व चिमूर या चार विधानसभा क्षेत्रात महायुतीचे भाजप उमेदवार अशोक नेते यांना भक्कम आघाडी मिळण्याचे संकेत दिसत आहेत तर ब्रम्हपुरी-चंद्रपुर, आणि आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात कांग्रेस आणि भाजप मधे अटीतटीची लढत असून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपआपल्या पक्षाच्या विजयाची हमी देत आहेत. मात्र या दोन विधानसभा क्षेत्रात कांग्रेसचे उमेदवार डाँ. किरसान आघाडी घेऊ शकतात अशी चर्चा आहे. या क्षेत्रात महायुतीचे उमेदवार अशोक नेते व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्यात मुख्य लढत पहायला मिळाली. मतदानानंतर आता विजयाचे गणित मांडले जात आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस असली तरी जयपराजयाचे गणित मांडताना निवडणूक रिंगणात असलेले वंचित बहुजन आघाडी, बसपा, व अपक्ष उमेदवार यांचे मताधिक्यही महत्व ठेवणार आहे. या उमेदवारांचे मताधिक्य वाढले तर याचे सर्वाधिक नुकसान महाविकास आघाडीचे डाँ. किरसान यांचे होणार असून अशी चर्चा असून या मताधिक्याचा लाभ महायुतीचे अशोक नेते यांना होवून ते मोठया मताधिक्याने विजयी होतील असे संकेत आहेत. त्यामुळे धर्माजी मडावी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, पुरूषोत्तम शेडमाके जनसेवा गोंडवाना पार्टी, योगेश गोन्नाडे बसपा, हितेश मडावी वंचित बहुजन आघाडी या उमेदवारांचे मताधिक्य किती वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून क्षेत्रात कुणाचे पारडे जड ठरणार याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण या लोकसभा निवडणुकीतील जयपराजयावर आगामी विधानसभा निवडणुकीचे समीकरण अवलंबून राहू शकते, अशी जाणकारांमध्ये चर्चा आहे.
