शेतकरी वर्गाकडे प्रशासनाचे व शासनाचे दुर्लक्ष फक्त टिव्ही मध्ये २ टक्के जि.डी.पी.वाढविण्याचे आमिष
गोंदियाः- गोंदिया जिल्ह्यातील हजारो हेक्टर मध्ये धान लागवड शेतक-यांनी केलेली आहे.शेतकरी वर्गाचे धानाचे उत्पादन निघालेले आहे.शेतकरी वर्ग हा आपली शेती करण्यासाठी व्याजाने पैसे काढुन शेतात लावत असतो.आज गोंदिया जिल्हयातील ७५ टक्के शेतकरी व्याजाने पैसे काढुन शेती करतात.शेतकरी हा शेती मधील उत्पादन निघाल्यावर जास्त वेळ घरात धान ठेवु शकत नाही.त्याला नाईलाजास्तव कमीत- कमी किंमतीने व्यापाराला धान विकावे लागतात. सरकार शेतकरी वर्गाला श्रीमंत बनविण्याचे स्वप्न दाखवुन थट्टा करण्याचे काम करतो असे वाटत आहे. शेतकरी वर्ग शुध्दा ६००० घेवुन शांत बसला आहे.६ हजार मिळाल्यावर शेतकरी खरचं श्रीमंत होत आहे का? यांचे गांर्भिर्य शेतकरी युवकांनी तपासला पाहीजे.शेतकरी वर्गाला ह्या वर्षी हमी भाव मिळण्याचे संकेत दिसत नाही.सोसायटी चालु होणारच नाही तर शेतकरी यांना हमी भाव मिळणार नाही. शासन स्तरावरुन शेतकरी वर्गाची पिळवणुक थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेतील का?हाच प्रश्न पुढे येतो आहे.