????गुरुदेव सेवा मंडळ घाटटेभंनीचे उपक्रम 15 दिवसीय बाल संस्कार शिबिराचे आयोजन
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
प्रति वर्षांनुसार या वर्षी सुद्धा श्री गुरुदेव सेवा मंडळ घाटटेभंनीच्या वतीने 1 मे ते 16 मे पर्यंत 15 दिवसीय बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात 90 विध्यार्थी निवासी बाल संस्कार शिबिराचा लाभ घेत आहेत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्थापित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणाली अनुसार नियमित दिनचर्या, व्यसन मुक्त समाज, ग्रामगीता, ग्रामस्वच्छता आधुनिक शिक्षण, राष्ट्रीय एकात्मता व संस्कारमय जीवन जगण्याची कला, खानपान आदी विषयावर भर दिले जात आहे. कार्यक्रमाचे उदघाटन गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक भोजराज फुंडे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी संगीताताई निलेश दोनोंडे, सेवा मंडळाचे सचिव रमेशभाऊ चुटे, यशवंतराव दोनोंडे, मारोती देशमुख, संगीताताई राजेंद्र दोनोंडे, बाबुलाल हेमने, मधुकाबाई चूटे, नामानंद फुंडे, उर्मिलाबाई पारधी, राजकुमार दोनोडे, अंजुबाई ठाकरे, टिकाराम पारधी, कमलाबाई डोये, राजेश्वर दोनोडे, गणपत फुंडे, सीताराम फुंडे, वासुदेव उईके, ज्ञानेश्वर दोनोडे, अशोक पाथोडे, महेश चुटे, मिथुन देशमुख व गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व भारतमाताच्या चित्राचे पूजन, दिप प्रज्वलन माल्यार्पण करून करण्यात आले. दरम्यान दिंडीयात्रा यात्रा काढून गावात भ्रमन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, आधुनिकतेशी समन्वय साधून भारताची आध्यात्मिक, राष्ट्रीय आणि पारंपरिक गृहरचना हे महापुरुषांच्या निर्मितीचे शक्तिकेंद्र बनावे, बालमनात चारित्र्य, संस्कार राष्ट्रप्रेम व विध्यार्थ्यांच्या वैचारिक विकासासाठी म्हणून विविध संस्कारमय विषय घेऊन 15 मे पर्यंत उन्हाळी निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचा भावी भविष्य विचारवंत व सुसंस्कारी व्हावे व प्रत्येक घरातून सुसंस्कारी, राष्ट्रप्रेमी, तेजस्वी युवक निर्माण व्हावेत. अंगीकृत असलेले सुप्त गुण कला-कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी मिळावी शैक्षणिक ज्ञानासह संस्कार मिळावे हे मुख्य उद्देश समोर ठेऊन शिबीराचे आयोजन करण्यात आले मत गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक भोजराज फुंडे व सचिव रमेश चुटे यांनी व्यक्त केले. संस्कार शिबिरात गावातील विध्यार्थ्यानी मोठया संखेत भाग घेतला असून कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कार्यक्रमाच्या संचालनाची जवाबदारी संगीता दोनोंडे यांचे कडे तर आभार व्यक्त करण्याची जवाबदारी बाबुलाल हेमने यांचे कडे आहे. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वंश चुटे, गौरव दोनोडे, रोहित ब्राह्मणकर, समीर चुटे, अंकित दोनोडे, हर्ष दोनोंडे, किरण दोनोंडे, देवकाबाई कोरे, रंजनीबाई वाढई प्रयत्न करीत आहेत.