🔹शंभर टक्के निकाल, उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर बोर्ड द्वारे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक विभाग बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात जिल्हा परिषद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय साखरीटोला/सातगावचा परीक्षा निकाल शंभर टक्के लागला असून यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. 2024 बोर्ड परिक्षेकरिता एकूण 55 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 03 विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले असून, प्रथम श्रेणीत 40 विद्यार्थी, आणि द्वितीय श्रेणीत 12 विध्यार्थी उत्तीर्ण झाले. जि.प. विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातून कु. काजल विजय रहिले हिने 79.00 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला. राजीव कमल चुटे याने 77.50 टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर निखिल सुनील कोरे यांनी 75.17 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकवीला आहे. दरम्यान आज 24 मे शुक्रवार रोजी शाळा व्यवस्थापण समितीच्या वतीने सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय साखरीटोला येथे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षता समितीचे अध्यक्ष कृपाल बहेकार यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समितीचे उपाध्यक्ष रवी पडोळे, प्राचार्य आर. एस. मेश्राम, सहाय्यक शिक्षक एस. एच. कटरे, टी. वाय. पवार, परिचर कटरे, कु. शेंडे, गुणवंत विध्यार्थी व पालक उपस्थित होते. जि.प. कनिष्ठ महाविद्यालयातील कु. आरती कैलास हुकरे, 74.67 टक्के, कु. दीपा देवराज कोरे 74.50 टक्के, कु. शिल्पा संतोष रहिले 74.50 टक्के, कु. कांक्षी सुरेश पटले 74.50 टक्के, सतीश सुकराम शेंडे 71.83 टक्के, कु. कल्याणी हिवराज टेम्भेकर 70.33 टक्के, पियुष विजय चुटे 70.17 टक्के, कु. गौरी रेवलाल बिसेन हिने 70.00 टक्के गुण घेऊन यशस्वी झाले आहेत उपस्थित सर्व उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. जि.प. विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल साखरीटोला येथील सामाजिक कार्यकर्ते व तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, प्रभाकर दोनोंडे, डाँ. संजय देशमुख, डाँ. अजय उमाटे, सुनील अग्रवाल, संकटाप्रसाद मिश्रा, मनोज अग्रवाल, यांनी जि.प विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, आणि 12 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या समस्त विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
