🔹कला शाखेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
🔹प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे घरी जाऊन केले स्वागत
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर बोर्ड द्वारे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक विभाग बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात चंद्रमणी बुद्ध विहार समिती आमगाव व्दारा संचालित बॅरिस्टर राजाभाऊ कला कनिष्ठ महाविद्यालय साखरीटोलाचा परीक्षा निकाल शंभर टक्के लागला असून यंदाही कला शाखेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. 2024 बोर्ड परिक्षेकरिता एकूण 35 विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्या जागेश्वर दोनोंडे हिने 71.18 टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला, तर निराली देवेंद्र चुटे हिने 68.17 टक्के गुण घेऊन दृतीय, व आदिती राजकुमार भांडारकर हिने 64.17 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकवीला आहे. एकूण दहा विध्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य सागर काटेखाये, प्रा. गणेश भदाडे, प्रा. मुकेश बावनथडे, परिचर अमन कुंभलवार यांनी विद्यार्थ्यांचे घरी जाऊन विध्यार्थी आणि पालकांचे कौतुक केले. बॅरिस्टर राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालय हे साखरीटोला येथील पहिले व जुने महाविद्यालय असून येथील प्राचार्य व प्राध्यापकांनी कला शाखेत आपला जबरदस्त ठसा उमटवून ठेवला आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाने 12 वी कला शाखेत आपली परंपरा कायम ठेवत यंदा सुद्धा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल साखरीटोला येथील सामाजिक कार्यकर्ते व तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, प्रभाकर दोनोंडे, डाँ. संजय देशमुख, डाँ. अजय उमाटे, सुनील अग्रवाल, संकटाप्रसाद मिश्रा, मनोज अग्रवाल, यांनी बॅरि. राजाभाऊ कला कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, आणि 12 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या समस्त विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
